प्रतिनिधी - संतोष भालेराव
6 जून 2026 वाशिम : कोळी महासंघाच्या वतीने कोळी महादेव, कोळी मल्हार, टोकरे कोळी, डोंगर कोळी व ढोर कोळी समाजाच्या प्रलंबित मागण्यांच्या अनुषंगाने शासनाने निर्णयांची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी दिनांक 16 जून 2026 रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
संघटनेच्या म्हणण्यानुसार, दिनांक 20 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची अंमलबजावणी अद्याप झालेली नसल्याने राज्य शासनाकडे स्मरणपत्र सादर करण्यात आले आहे. मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास पुढील अधिवेशनादरम्यान तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही संघटनेने दिला आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयांमार्फत शासनाला निवेदन सादर करण्यात येणार असल्याचेही संघटनेने स्पष्ट केले आहे.
