Breaking Ticker

शेतातील हातभट्टीचा दारू अड्डा उध्वस्त पोलीस निरीक्षक देविदास चोपडे उतरले मैदानात



श्रीक्षेत्र माहूर  प्रविण बरडे 

माहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास चोपडे सुट्टीवर असल्याचा फायदा घेत हातभट्टी दारू विक्री करणाऱ्यांनी डोके वर काढल्याने हजर होताच पोलीस निरीक्षक देविदास चोपडे स्वत खबर मिळाल्याने धाडी टाकत असून मौजे पापलवाडी येथे आपल्या शेतातील टीन शेडमध्ये मोठ्या प्रमाणात हातभट्टी दारू बनविण्यासाठी रसायन तयार केल्याची माहिती मिळताच दि 5 रोजी धाड टाकून हातभट्टीचा अड्डा उध्वस्त करत 25 हजाराचा चा मुद्देमाल नष्ट करण्यात आल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे

नांदेड जिल्ह्यासह माहूर तालुक्यात रोजगाराचा अभाव तसेच व्यसनाधीनता वाढल्याने नागरिकासह युवक वर्ग हातभट्टी दारूचा आधार घेत आपले व्यसनाची सवय कायम ठेवत असल्याने अनेक घरात भांडणे वाढत असून महिला मुलांना सोडून आपल्या माहेरी जाण्याचे प्रकार वाढत आहेत त्यामुळे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी आपरेशन फ्लॅश आउट अंतर्गत हातभट्टी दारू निर्मिती करणाऱ्यांचा कायम बंदोबस्त व्हावा म्हणून जिल्ह्यात हातभट्टी दारू विरुद्ध मोठ्या प्रमाणात मोहीम राबवित असल्याने पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांनी दारू निर्मिती होण्याआधीच अनेक अड्डे उध्वस्त करून वारंवार कारवाया झालेल्या गुन्हेगारांच्या तडीपारीचे प्रस्ताव बनविणे सुरू केले आहे 

दि 5 रोजी खबर मिळताच मौजे पापलवाडी येथील शेतातील गोठ्यात पोलीस निरीक्षक देविदास चोपडे पोहेका ज्ञानोबा खंदाडे पोहेका गोपानवाड यांचे सह कर्मचाऱ्यांनी धाड टाकून पाच टाक्यात बनवलेले रसायन मोहफुल किंमत 25 हजार नष्ट करून एका विरुद्ध गुन्हा दाखल केल्याने हातभट्टी दारू विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून तालुक्यातील कुठल्याही गावात अशा प्रकारचे काम करणाऱ्यांची माहिती देण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांनी केले आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.