पुणे जिल्हा प्रतिनिधी अनिल कांबळे(12जून) पिंपरी -
हिंदू धर्मातील पवित्र अधिक मासाच्या पावन पर्वाचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथे महाराष्ट्रातील सर्वांत मोठा 'लक्ष्मी-नारायण पूजन सोहळा' अत्यंत भक्तिमय आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला. सनातन धर्म, संस्कृती आणि परंपरांचा गौरव करण्यासाठी भोसरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार महेश लांडगे आणि 'शिवांजली सखी मंच'च्या प्रमुख पूजा महेश लांडगे यांच्या पुढाकारातून या भव्य धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
वेदमंत्रांच्या घोषात पाद्यपूजन आणि सोहळा
मोशी येथील जय गणेश लॉन येथे हा अभूतपूर्व सोहळा पार पडला. या कार्यक्रमात राज्यभरातून आलेल्या ३३० हून अधिक ब्राह्मण दांपत्यांचे विधिवत पाद्यपूजन आणि लक्ष्मी-नारायण पूजन करण्यात आले. मंचावर प्रतिष्ठापित केलेली श्री विठ्ठल-रुक्मिणीची मनमोहक मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. वेदमंत्रांच्या जयघोषात पार पडलेल्या या सोहळ्याने उपस्थितांना एक वेगळीच आध्यात्मिक अनुभूती दिली. पूजनानंतर सर्व दांपत्यांना सन्मानपूर्वक आहेर प्रदान करून त्यांचे स्नेहभोजनही आयोजित करण्यात आले होते.
मान्यवरांची मांदियाळी
या ऐतिहासिक धार्मिक सोहळ्यास कला, शिक्षण, आरोग्य, प्रशासन, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्तींनी हजेरी लावली होती. तसेच हजारो नागरिकांनी आणि महिला भाविकांनी उपस्थित राहून संस्कृतीप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली. समाजात अशा उपक्रमांमुळे धार्मिक आणि नैतिक मूल्यांची जपणूक होते, अशा शब्दांत उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
"अधिक मास हा केवळ धार्मिक विधींचा काळ नसून आत्मशुद्धी आणि संस्कार संवर्धनाची एक पवित्र संधी आहे. सनातन हिंदू संस्कृतीची ही अमूर्त परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. प्रत्येकाच्या जीवनात श्रद्धा आणि सेवाभाव वाढीस लागावा हीच
ईश्वरचरणी प्रार्थना."
अशी प्रार्थना भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेशदादा लांडगे यांनी केल्याचे मनोगतात सांगितले.
