Breaking Ticker

नवोदित विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत.



 जत / सांगली प्रतिनिधी अरुण कोळी 

श्री. रामराव विद्यामंदिर या नामांकित प्राथमिक शाळेत नव्या शैक्षणिक वर्षात १ ली ते ४ थी प्रवेश प्रक्रिया.माजी नगरसेविका सौ. शारदाताई कुंभार व सामाजिक कार्यकर्ते श्री. चंद्रकांत उर्फ पापा कुंभार यांनी केले नवोदित विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत.

  जत येथील नामांकित म्हणून ओळख असलेल्या श्री. रामराव विद्यामंदिर प्राथमिक शाळेची प्रवेश प्रक्रिया पुर्ण झाली असून या शाळेत इयत्ता १ ली ते ४ थी पर्यंत २२५ विध्यार्थी आहेत.

   नवीन शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता १ ली च्या विध्यार्थ्यांना या शाळेत प्रवेश देण्यात आला. या सर्व विध्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन येथील जत नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका सौ. शारदाताई कुंभार व सामाजिक कार्यकर्ते, शिवनगर व शिवनेरी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत उर्फ पापा कुंभार या उभयतानी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.

या शाळेत अब्याकस, वैदिक गणित, रंगोस्तव चित्रकला स्पर्धा, स्पर्धा परीक्षा अंतर्गत टी. एस. ई. या सारख्या विविध स्पर्धाचे आयोजन केले जाते.या प्राथमिक शाळेला दोन वर्षांपूर्वी आय. एस. ओ. मानाकण प्राप्त झाले आहे.यावेळी विध्यार्थ्यांना शालेय साहित्याचे मान्यवरांचे हस्ते वाटप करण्यात आले.

याप्रसंगी प्रशाळेचे मुख्याध्यापक श्री. पाठक सर, सौ. साळे मॅडम, आर. टी. कोळी, कारंडे डी. एम.बालवाडीच्या मुख्याध्यापिका सौ.श्रद्धा शिंदे व सहकारी शिक्षिका शिखरे मॅडम उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.