कल्पेश लोखंडे, प्रतिनिधी - जव्हार
जव्हार रायतळे भागातील रस्ते सध्या अत्यंत दयानिय अवस्थेत असून, जांभूळविहीर (पूर्व )सिरसाठ यांच्या घरापासून ते गोसिया मस्जिद, पुढे शासकीय मुलींचे वसतिगृह पर्यंत चा रस्ता खड्यांचा माहेरघर बनला आहे. या रस्त्यावरील खड्यामुळे वाहचालक आणि पादचाऱ्यांना जीवघेण्या प्रवासाचा सामना करावा लागत आहे, मात्र संबंधीत प्रशासन याकडे डोळेझाक करत असल्याने स्थानिकामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
दैनंदिन प्रवाशांचे हाल
या मार्गावरून दररोज शालेय विद्यार्थी, मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थिनी, स्थानिक रहिवाशी,आणि भाविक ये जा करत असतात रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे दुचाकीस्वरांचे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेषत :रात्रीच्या वेळी खड्डे दिसत नसल्याने अनेक जन पडून गंभीर जखमी होतात पावसाळ्यात या खड्यात पाणी साचून रस्ता दलदलीचा बनत असल्याने स्थिती अधिकच बिकट होते.
प्रशासनाची उदासीनता
स्थानिक नागरिकांनी अनेकदा संबंधित विभागाकडे रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे, मात्र केवळ आश्वासन देऊन वेळ मारून नेली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे आमच्या परिसरातील या प्रमुख मार्गाकडे प्रशासन का दुर्लक्ष करत आहे? एखादी मोठी दुर्घटना घडल्यावरच प्रशासन जागे होणार का असा सवाल नागरिक विचारत आहेत.
नागरिकांची मागणी
रायतळे भागातील या रस्त्याचे त्वरित डांबरीकरण करावे किंवा खड्डे बुजवून रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित करावा, अशी आग्रही मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे, जर प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष दिले नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही स्थानिकानी दिला आहे स्थानिक प्रशासनाने तातडीने दखल घेऊन हा रस्ता दुरुस्त करावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
