Breaking Ticker

महिला भाविकाची पर्स केली परत श्रीक्षेत्र माहूर गडावरील संत गुलाब बाबा हॉटेल चे संचालक पत्रकार संजय घोगरे यांचा प्रमाणिकपणा




श्रीक्षेत्र माहूर प्रविण बरडे 

नागपूर येथील महिला भाविक माहूर गडावर रेणुका मातेचे दर्शन घेण्यासाठी आले असता त्यांची मंगळसूत्र कागदपत्रे व इतर साहित्य असलेली पर्स संत गुलाब बाबा हॉटेल येथे विसरली होती दर्शन आटोपून माहूर शहरातील लॉजवर गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आल्याने त्या घाबरल्या परत गडावर येऊन चौकशी केली असता हॉटेलचे संचालक संजय घोगरे यांनी त्यांना ओळखून हॉटेलमध्ये बोलावत त्यांची पर्स त्यांना परत केल्याने महिला भाविकासह गडावरील सर्व प्रतिष्ठान चालक विश्वस्त मंडळाकडून त्यांचे अभिनंदन होत आहे 

धोंड्याचा महिना असल्याने माहूर गडावरील सर्व मंदिर मठात भाविकांची मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी होत आहे येत्या पंधरा तारखेपर्यंत गडावर भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याने भाविकांचे सुरक्षेसाठी पोलिसांकडून विशेष सुरक्षा पथकाच्या नेमणुकीची मागणी होत असून दि 4 रोजी नागपूरवरून श्रीमती माधुरी पळसेकर ह्या आपल्या मुलीसह रेणुका माता मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या दर्शन झाल्यानंतर चहा घेण्यासाठी त्या संत गुलाब बाबा हॉटेलमध्ये थांबल्या असता जाताना त्यांची पर्स टेबलावरच विसरली त्यामुळे हॉटेलचे कर्मचारी व संचालक संजय घोगरे यांनी ती पर्स ताब्यात घेऊन मंदिर व्यवस्थापनास ही बाब कळविली होती 

श्रीमती माधुरी कळसेकर यांनी शहरात जाऊन लॉज वर रूमची चावी पाहण्यासाठी पर्स ची आठवण आली असता त्या घाबरून पुन्हा परत मंदिरावर आल्या येथे संजय घोगरे नगरसेवक प्रतिनिधी राजू सौंदलकर यांचे सह व्यवसायिकांनी त्यांना हॉटेलमध्ये नेऊन ती पर्स व आतील सर्व साहित्याची खातरजमा करून त्यांना परत केली त्यामुळे त्यांनी संजय घोगरे कर्मचारी आणि माहूरकरांचे आभार व्यक्त केले संजय घोगरे हे शहरातील प्रतिष्ठित पत्रकार असल्याने त्यांनी केलेल्या कार्याचे मंदिर व्यवस्थापन समिती व्यवसायिक भाविक नागरिकातून त्यांचे अभिनंदन होत आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.