Breaking Ticker

अखेर पानद रस्ता मोकळा करण्यात आला

 


मुनीर अब्बास शाह छ.संभाजीनगर प्रतीनीधी 

शेतकऱ्यांनी केला आनंद व्यक्त.....

तालुक्यातील मौजे ताजनापूर शिवारात अनेक वर्षांपासून बंद असलेला शेत पाणंद रस्ता आज रोजी महसूल व पोलीस विभागाच्या उपस्थित मोकळा करण्यात आल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.

मौजे ताजनापूर येथील अनेक वर्षापासून बंद असलेले शेतपाणंद रस्ता महसूल व पोलिस प्रशासनाच्या उपस्थित मोकळे करण्यात आला. मा तहसीलदार तथा कार्यकारी अधिकारी दंडाधिकारी श्री. संतोष गुट्टे यांच्या आदेशाने रस्ता मोकळा करण्यात आला. मौजे ताजनापूर ता. खुलताबाद येथील गट क्रमांक ५३ व ५५ ला ये जा साठी गट क्रमांक ५४ मधून रस्ता मोकळा करण्यात आला.

अर्जदार दिपक काळे व इतर शेतकरीयांचा अनेक वर्षापासून बंद केलेला रस्ता . खुला करण्यासाठी मंडळ अधिकारी बाजार सावंगी संजय परदेशी ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) शेखर बावस्कर, नारायण पढे, किरण मैद, यांनी अर्जदार व गैरअर्जदार यांच्या संमतीने गाडी रस्ता मोकळा करण्यात आला. या वेळी, पोलीस पाटील संजय कोतकर,

पोलीस कर्मचारी राम राठोड, प्रियंका काळे अर्जदार व गैरअर्जदार यांच्या संमतीने रस्ता मोकळा करण्यात आला. शेती मशागत, खते बीजवाई, शेतातील माल ने आण व विक्री साठी नेण्यासाठी खूप अडचणी निर्माण होत असे रस्ता मोकळा झाल्यामुळे शेतकऱ्यांतून आनंद समाधान व्यक्त करण्यात आला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.