(प्रतिनिधी- कैमरॉन काकडे मुंबई उपनगर)
महाराष्ट्र अशा ठिकाणी कुठे चालला आहे? माझ्या मते, भांडुप रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरील स्वच्छतागृह परिसरात संशयास्पद हालचाली होत असल्याचे दिसून येते. याकडे रेल्वे पोलीस आणि रेल्वे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे .
कोणीही स्वच्छतागृहात जात असताना सुरक्षित वातावरण असणे आवश्यक आहे. या परिसरात कोणत्याही प्रकारच्या बेकायदेशीर किंवा मुलांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या कृती होत असतील, तर त्याची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी.
आमची मागणी आहे की स्वच्छतागृहाबाहेर सुरक्षा रक्षक नेमावेत. तसेच, ऑनलाइन अॅप्सचा गैरवापर होत असल्यास त्याची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करावी.
उद्या एखादी गंभीर घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोणाची असेल? रेल्वे पोलीस, रेल्वे प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी आमची विनंती आहे.
महाराष्ट्रामध्ये काय आपण पाहत आहोत, की चक्क मुलांचे शोषण केले जात आहे. तेही अशा ठिकाणी बसमध्ये, सार्वजनिक स्वच्छतागृहात, रेल्वेमध्ये. नेमकं काय चाललं आहे? गर्दीचा फायदा घेऊन अशा घटना घडत आहेत.
तरीही याबाबत न्यायालयाकडून नोटीस आली नाही. महानगरपालिका कधी जागी होणार? नागरिक म्हणतात, आधी मुलींवर बलात्कार होत होता, आता मुलांवरही अत्याचार होत आहेत.
यासाठी काही वेबसाइट्स आणि अॅप्स आहेत. आमची सरकारला विनंती आहे की अशा अॅप्सचा गैरवापर होत असेल तर त्याची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी. कारण याचा लहान मुलांवर वाईट परिणाम होत आहे.
अशा घटनांमध्ये मुलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी सांगितले.
