Breaking Ticker

कसाबखेडा येथील जिल्हा परिषद शाळेला कुलूप ठोकून प्रवेशद्वारावर आंदोलन.



शिक्षकांच्या रिक्त पदे तात्काळ भरण्याची मागणी.... 

मुनीर अब्बास शाह छ.संभाजीनगर प्रतीनधी.....

 खुलताबाद तालुक्यातील कसाबखेडा जिल्हा परिषद प्रशालेत विद्यार्थ्यांचे कुलूप ठोक आंदोलन

तीव्र घोषणाबाजी : शिक्षकांची रिक्त पदे तातकाळ भरण्याची मागणी

खुलताबाद : तालुक्यातील कसाबखेडा येथील

पीमश्री जिल्हा परिषद प्रशालेत शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी शनिवारी (दि. ११) शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप ठोकून जोरदार आंदोलन केले.


कसाबखेडा येथील जि. प. प्राथमिक शाळा, मराठी व उर्दू माध्यम प्रशाला एकाच आवारात भरतात. या शाळांमध्ये पहिली ते दहावीपर्यंत सुमारे १,२५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून इंग्रजी व गणित या महत्त्वाच्या विषयांसह शिक्षकांची एकूण पाच पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. नियमित तास होत नसल्याने शैक्षणिक गुणवत्तेवर आणि निकालावर विपरीत परिणाम होत असल्याची तक्रार विद्यार्थी व पालकांनी केली आहे.


 आंदोलन  आधीक तीव्र करणार.....

कसाबखेडा येथील या जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांसह एकूण १,२५० विद्यार्थी शिक्षण घेत आवारात उर्दू माध्यमाच्या प्रशालेत ५५० आहेत. इंग्रजी आणि गणितासारख्या महत्त्वाच्या विषयांनाच शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. रिक्त पदे भरली नाहीत तर शाळा बंद ठेवण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

या समस्येमुळे अनेक विद्यार्थ्यांनी वेरूळ येथील शाळांमध्ये प्रवेश घेतल्याने शिक्षण व्यवस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. 'शिक्षक द्या, मुलांचे भविष्य बरबाद करू नका' अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी परिसर दणाणून सोडला. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ही पाचही रिक्त पदे तातडीने न भरल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा विद्यार्थी व पालकांनी दिला आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.