Breaking Ticker

आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात अंबाजोगाईत ४ ऑगस्टला धडकणार महामोर्चा



आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात अंबाजोगाईत ४ ऑगस्टला महामोर्चा; ५९ जातींचे शक्तिप्रदर्शन


अंबाजोगाई (प्रतिनिधी): विशाल जोगदंड 

अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या निर्णया विरोधात अंबाजोगाईत तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. संवैधानिक मार्गाने महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयाला विरोध दर्शवण्यासाठी मोर्चाची तारीख:'४ ऑगस्ट' रोजी सकाळी 11वाजता, संविधानिक राष्ट्रनिर्मिता डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणाहून ते उपविभागीय कार्यालय अंबाजोगाई येथे धडकणार आहे 

शहरातून भव्य महामोर्चा काढण्याचा निर्णय काल (दि. १9) झालेल्या बैठकीत घेण्यात आला. हा मोर्चा कोणत्याही जाती किंवा धर्माच्या विरोधात नसून, केवळ आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरुद्ध असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. 

लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आंबेडकरी चळवळीतील सर्वच अनुयायी सहभागी होते

'संघर्षभूमी' अंबाजोगाई येथे पार पडलेल्या या बैठकीला शहरातील ग्रामीण भागातील महिला, ज्येष्ठ नागरिक, तरुणांनी मोठी उपस्थिती लावली होती. अनुसूचित जातीच्या आरक्षण उपवर्गीकरणामुळे ५९ जातींवर होणारा अन्याय रोखण्यासाठी हे सर्व आंबेडकरी समाज एकवटला आहे. आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी या बैठकीत विविध संयोजन समित्यांचीही स्थापना करण्यात आली आहे.

शांतीपूर्ण आणि शिस्तबद्ध आंदोलनाचे नियोजन

आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, हा महामोर्चा विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून निघून उपविभागिय कार्यालयावर धडकणार आहे. संपूर्ण मोर्चा अतिशय शांततापूर्ण आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडेल, असेही यावेळी सांगण्यात आले. मोर्चाच्या शेवटी, ५९ जातींमधील नागरिक आणि युवा भिमसैनिक प्रतिनिधींच्या उपस्थितीत उपविभागिय अधिकारी यांना एक निवेदन सादर केले जाणार आहे.

"भावी पिढीच्या हक्कासाठी लढा"

या आंदोलनाचे मुख्य उद्दिष्ट ५९ जातींमधील भावी पिढीच्या हक्कांचे रक्षण करणे हे आहे. "आम्ही कोणत्याही विशिष्ट जातीच्या विरोधात नाही, तर आरक्षणाचे जे उपवर्गीकरण केले जात आहे, त्या अन्यायी निर्णयाच्या विरोधात हा लढा पुकारला आहे," असे मत यावेळी आंदोलकांनी व्यक्त केले. या महामोर्चात मोठ्या संख्येने सर्व भीमअनुयायी यांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.