Breaking Ticker

जत शहरात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा, हफ्तेखोरीला सोकावलेल्या जत पोलिसांकडून वाहतूक कोंडीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष.



जत सांगली प्रतिनिधी अरुण कोळी

मंगळवारी जत शहरात आठवडी बाजार भरतो. या आठवडी बाजारासाठी जत शहरासह पंचक्रोसीतील लोक बाजारासाठी शहरात येत असतात.जत नगरपरिषदेमार्फत हा आठवडा बाजार भरविण्यात येतो.परंतु शहरात एवढा मोठा बाजार भरलेला असतानाही या बाजारात योग्य नियोजन नसल्याने याचा त्रास सर्वसामान्यांबरोबरोच बाजारासाठी येणाऱ्या बाजार करुनाही सहन करावा लागत आहे.रस्त्याच्या दोन्ही बाजूस भाजी विक्रेते बसून व्यवसाय करीत असल्याने व त्यातच फाळविक्रेतेही आपल्या चारचाकी गाड्या लावून फळविक्री करीत असल्याने रस्त्यावर मोठया प्रमाणात अतिक्रमने होऊन वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे.

शहरातील महाराणाप्रताप चौक, बनाळी कॉर्नर, मटणमार्केट, तेली गल्ली, पेठेतील हनुमान मंदिर व प्रमुख बाजारपेठेत मोठया प्रमाणात दुचाकी व चारचाकी वाहणे रस्त्यावरच उभी करीत असल्याने व वाहनचालकांवर पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने शहरात वारंवार वाहतूक कोंडी दिसून येत आहे.वाहतूक नियंत्रणासाठी नेमण्यात आलेले वाहतूक पोलीस हे वाहतूक नियंत्रण करण्याऐवजी शहराच्या बाहेर रस्त्यावर थांबून कोणते नियंत्रण करतात याची चर्चा जत शहरात सुरू आहे.

जत शहरात कायदा व सुव्यवस्थेचा अक्षरशः बोजवारा उडाला असून. शहरात अल्पवईन मुलांच्या हातात स्टेरींग आले आहे. दुचाकीवर ट्रिपल सीट बसून जोरात वाहणे चालवीने नित्याचे झाले असून वाहनचालकांवर पोलिसांचा धाक राहिला नाही.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.