मुनीर अब्बास शाह छ.संभाजीनगर
बाजार सावंगी येथील शुक्रवारी भरलेल्या आठवडी बाजारात मोबाईल चोरट्यांनी धुमाकूळ घालत चार जणांचे मोबाईल लंपास केले. याप्रकरणी धामणगावचे जगदीश माचवे यांनी पोलिस चौकीत तक्रार दिली असून, इतर तिघांनी तक्रार टाळली आहे. बाजारात मोबाईल चोरीच्या घटना वाढल्याने आठवडी बाजाराच्या दिवशी पोलिसांनी गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
