कैमरॉन ककङे मुंबई उपनगर
भांडुप पश्चिम येथील एल.बी.एस. मार्गावरील सोनापूर परिसरात मुसळधार पावसामुळे रस्त्याचा काही भाग खचल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात वाहतुकीची मोठी कोंडी झाली.
घटनेची माहिती मिळताच महानगरपालिकेचे अधिकारी आणि आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले. सुरक्षिततेच्या दृष्टीने परिसराला बॅरिकेड्स लावण्यात आले असून वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, सततचा पाऊस आणि जवळ सुरू असलेले उत्खनन हे रस्ता खचण्यामागील संभाव्य कारण असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
महापालिकेने या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.
