Breaking Ticker

अफाट कष्ट जिद्द व मेहनत व प्रामाणिकपणा यांच्या बळावर,सामाजिक कार्याचा अनुभव असणारे ... नारायण पाटील वडजे उंद्रीकर



नांदेड जिल्हा प्रतिनिधी मारोती वडजे 

   वाढदिवस ...

      बेसिक शिक्षण घेऊन  शेती करत करत व्यवसायाची आवड असल्यामुळे शिक्षण क्षेत्रात तालुका ,व जिल्ह्याच्या ठिकाणी उत्कृष्ट हॉस्टेल करुन समाजात आदर्श निर्माण केले त्याचसोबत समाजकारणात व राजकीय क्षेत्रात वयाच्या आठराव्या वर्षापासून सेवा सहकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन,व अनेक सामाजिक संघटनेच्या माध्यमातून तालुका पदापासून ते जिल्हाध्यक्ष पर्यंत तीन संघटनेचे जिल्हा अध्यक्ष पद  15 वर्ष पासून भुषवुन नावलौकिक असणारे व्यक्तिमत्व व अशा नेतृत्वाला यांच्या वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा.

    साधी राहणीमान असणारे नारायण पाटील वडजे यांचा जन्म 20 जुलै 1980 रोजी मु. पोस्ट उंन्द्री येथे झाला. त्यांचे वडील गणेशराव पाटील हे गाव कामगार पोलीस पाटील संघटनेचे जिल्हा सेक्रेटरी,व पोस्ट ऑफिसमध्ये बिपिएम म्हणून काम करित अनेक अधिकारी यांच्या हस्ते उत्कृष्टपणे आदर्श पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली,व अनुभवामुळे त्यांच्यावर उत्तम सुसंस्कार केल्यामुळे त्यांचे तिन्ही भावंडं आजही वडिलांच्या निधनानंतर एकत्रित संयुक्त कुटुंबात गुण्यागोविंदाने राहत आहेत . वडिलांचे छत्र हरवले असल्यामुळे दोन्ही भावांना योग्य मार्गदर्शन करुन योग्य दिशा दिली. 

      नारायण पाटील वडजे यांना या जन्मदिनी खुप खुप शुभेच्छा..  वाढदिवसाची माहिती दिली

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.