श्रीक्षेत्र माहूर प्रवीण बरडे
श्री आनंद दत्तधाम आश्रम माहूर गडाचे महंत राष्ट्रसंत दभप साईनाथ महाराज वसमतकर यांच्यावर महाराष्ट्र शासनाकडून आयटीआयचे मार्गदर्शक स्वच्छता अभियानाचे ब्रँड अँबेसिडर म्हणून जबाबदारी टाकण्यात आल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र राज्यासह राज्य बाहेरही निष्काम सेवा केल्याने त्यांच्याकडून राबविण्यात येत असलेले सप्तसुत्री कार्यक्रम ज्यामध्ये स्वच्छता अभियान शिक्षण अंधश्रध्दा निर्मुलन महिला सक्षमीकरण वृक्षारोपण पाणी जिरवा पाणी वाचवा प्रदुषण नियंत्रण व्यसनमुक्ती शेतकरी आत्मचिंतन रक्तदान शिबीर आध्यात्मिक जीवनाचा उध्दार या सह विविध कार्यक्रम राबवून शासनाकडे कार्य प्रगती अहवाल सादर केल्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे मंत्री आशिष शेलार यांनी त्यांचे कौतुक करत अभिनंदन केले यावेळी संभाजीनगर येथील उद्योजक सुरेश जगाडे दत्तकृपा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रल्हाद देवडे सर रामभाऊ ठोंबरे विशाल डोईफोडे यांचे सह मान्यवरांची उपस्थिती होती
धोंड्याच्या महिन्यात साईनाथ महाराज वसमतकर यांनी संपूर्ण महिनाभर माहूर गडावरील श्री आनंद दत्तधाम आश्रमात राहून तालुक्यासह राज्यभरातून आलेल्या भाविक भक्तांना धोंडे जेवण सह अन्नदान महापंगतीच्या स्वरूपात खाऊ घातले त्यामुळे राज्यसह देशातील विविध भागातून आलेल्या भाविकांनी महाराजांच्या अन्नदान कार्यक्रमाचे कौतुक करत केले दशसूत्री कार्यक्रमासह स्वच्छता अभियान वृक्ष लागवडीवर जास्त भर असल्याने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे मंत्री आशिष शेलार यांनी महाराजांचे विशेष कौतुक करून आयटीआय मार्गदर्शनासह आणखी मोठी जबाबदारी टाकण्याचे सुतोवाच केल्याने भाविक भक्तात आनंदाची लाट उसळली असून माहूर गडाच्या नावलौकिकात यामुळे मोठी भर पडणार आहे
आयटीआयचे प्रमुख मार्गदर्शक स्वच्छता दूत राज्याचे ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्ती झाल्यानंतर दभप साईनाथ महाराजांनी राज्यभरात असलेल्या सर्व आयटीआय शाखा मध्ये जाऊन स्वच्छता अभियान वृक्ष लागवड करून मार्गदर्शन केले असून शाळेमध्ये मार्गदर्शन करणे साहित्य वाटप विविध उपक्रम महाराजांच्या भक्तमंडळी करून राज्यभरात सुरूच असल्याने महाराष्ट्र शासनाकडून मोठी जबाबदारी टाकण्याची शक्यता निर्माण झाल्याने भाविक भक्तासह मान्यवराकडून राज्य शासनाकडून लोककल्याणकारी समाजसेवेची मिळणारी नविन जबाबदारी उचलण्याची तयारी सुरू झाल्याचे भक्तमंडळीकडून सांगण्यात येत आहे
