Breaking Ticker

अकोला बाजार येथील SBV BOYS नवयुवक मंडळाची नवीन कार्यकारणी जाहीर, अध्यक्षपदी सम्यक घुले यांची निवड....

 



 


 प्रतिनिधी यवतमाळ


  अकोला बाजार परिसरातील मुख्य रस्त्यावर झाडांचे संगोपन करण्यापासून प्रवासाची सुरुवात करून शालेय विद्यार्थ्यांसाठी 'माझे झाड, माझी जबाबदारी' ही विशेष स्पर्धा यशस्वीपणे राबवणाऱ्या आणि परिसरातील विविध शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रत्यक्ष वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या SBV BOYS नवयुवक मंडळ, अकोला बाजार' ची नवीन कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.ही निवड प्रक्रिया सर्वानुमते व अत्यंत उत्साहात पार पडली. यामध्ये मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा तरुण व सक्रिय युवा सामाजिक कार्यकर्ते सम्यक घुले यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.गावासाठी... सदैव तत्पर हे ब्रीद घेऊन चालणाऱ्या या मंडळाने आजवर केवळ बोलण्यापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृतीतून समाजकारण केले आहे. गावाच्या हिरवाईसाठी, वृक्ष संवर्धनासाठी आणि गावहितासाठी निस्वार्थी भावनेने काम करणे हाच या तरुणाईचा मुख्य हेतू आहे.घोषित करण्यात आलेली ही कार्यकारणी म्हणजे केवळ एक तांत्रिक नेतृत्व असून, मंडळाचा प्रत्येक लहान-मोठा कार्यकर्ता, सर्व सक्रिय सहकारी आणि संपूर्ण मित्रपरिवार एकत्र येऊन सामूहिक नेतृत्वाच्या भावनेने गावाचे काम करणार आहे, असे नवनियुक्त अध्यक्ष सम्यक घुले यांनी निवडीनंतर बोलताना स्पष्ट केले.या नवनियुक्त कार्यकारणीमध्ये उपाध्यक्ष म्हणून सुजित टिपले, सचिव म्हणून आकाश गुढे, कोषाध्यक्ष म्हणून स्वप्नील नगराळे तर सहसचिव म्हणून रोनक मेश्राम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच मंडळाच्या उपक्रमांची माहिती व पर्यावरण संवर्धनाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडिया प्रमुख म्हणून विनीत नरांजे, यश बनसोड, कारुण्य वाघमारे आणि सोहम शेंदरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.याशिवाय मंडळाचे अधिकृत सदस्य म्हणून अनुराग भगत, राज कनाके, दुर्गेश ठाकरे, विवेक नेवारे, नैतिक ठाकरे, वैभव मानकर, आकाश नेवारे,कार्तिक कोयरे,पवन टेकाम, लकी मेश्राम आणि कार्तिक राऊत यांची निवड करण्यात आली असून, सर्व सहकाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून आगामी काळातील सर्व सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहेत.समता बंधुता आणि विश्वास (SBV) या ध्येयाने नव्या नेतृत्वाखाली हे तरुण मंडळ अकोला बाजारच्या विकासासाठी सज्ज झाले आहे. झाडांना पाणी देण्यापासून ते शाळा-महाविद्यालयांमध्ये पर्यावरणाची जाणीव निर्माण करण्यापर्यंत सतत ग्राउंडवर कार्यरत असणाऱ्या या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे, सदस्यांचे आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या संपूर्ण मित्रपरिवाराचे अकोला बाजार येथील गावकऱ्यांकडून हार्दिक अभिनंदन केले जात असून, त्यांच्या पुढील सामाजिक प्रवासाला भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहेत.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.