नळेगाव प्रतिनिधी (हेमंत पतंगे)
नळेगाव:दि -छत्रपती संभाजी नगर येथील री सील डॉट इन या सेवाभावी संस्थेच्या वतीने ट्रीट इम्पिरियल संभाजी नगर याठिकाणी मराठ वाद्यातील विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तीना “मराठवाडा रत्न “ पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता .
यावेळी समाज सेवा, आरोग्य व क्रीडा, महिला बालकल्याण, कृषि व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल लातूर जिल्हा काँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष अनिल चव्हाण याना पुरस्कार देवून गौरव करण्यात आला.
यावेळी सुप्रसिद्ध अभिनेत्री मा वर्षा उसगावकर, महापौर समीर राजूरकर, शिक्षणधिकारी अश्विनी लाटकर, बोर्डाचे संचालक मा. सागर पवार, आयोजक मा.सुधीर पातोडे , मा.गजानन पठारे आदी मान्यवर उपस्थीत होते.त्यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल परिसरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
