तालुका प्रतिनिधी: जगन्नाथ पिदुरकर
कोरपना : तालुक्यातील कोडशी खुर्द येथे मोठ्या उत्साहात श्रींचा 116 पुण्यतिथी महोत्सव साजरा करण्यात आला असून या ऋषीपंचमी निमित्त श्री ची धार्मिक पूजा करण्यात आली.या उत्साहात समस्त गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहत दर्शनासाठी उत्साहित होते लाखो लोकांचे श्रद्धास्थान मानले जाणारे शेगाव तीर्थक्षेत्र याचे प्रतिरूप स्थान कोडशीत येथे या दिवशी पाहायला मिळाले . यात धार्मिक पूजा आणि ग्रंथ पोटी पारायण वाचन करण्यात आले व तसेच भजन संगीत देखील सहभागी झाले होते मोठ्या उत्साहाने श्रद्धा आणि भावाणी श्री चा पुण्यतिथी सोहळा पार पडला.
