Breaking Ticker

केंद्रीय मंत्री अमित शहा रविवारी 20 सप्टेंबर हुपरी जवाहर कारखान्यास भेट


 



जिल्हा प्रतिनिधी.वैभव हराळे

केंद्रीय मंत्री अमित शाह रविवारी जवाहर कारखान्यास भेट केंद्रीय गृह व सहकार मंत्री ना. अमित शाह रविवारी २० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सह. साखर कारखाना हुपरी येथे सकाळी ११ वाजता येणार आहेत. त्यांच्या हस्ते येथे उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पाची पायाभरणी होणार आहे, अशी माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी दिली.माजी मंत्री आवाडे बोलताना म्हणाले, सहकारी तत्वावर झिरो वेस्ट संकल्पनेतून शेती उत्पादनासाठीचा ६०० कोटी रुपये गुंतवणुकीचा बहुराज्य तत्वावरील प्रकल्प कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर कारखान्यावर सुरु होणार आहे. स्पेंट वॉश प्रेसमडपासून काँप्रेस्ड बायोगॅस (सीबीजी) निर्मिती व सायट्रीक अॅसिड व पोटॅश निर्मितीचा देशातील पहिला प्रकल्प येथे उभारला जाणार आहे.याच दरम्यान देशातील साखर उद्योगासमोरील आव्हान लक्षात घेवून हा प्रकल्प उभा केला जातोय असंही त्यांनी सांगितलं. या सोहळ्यासाठी केंद्रीय सहकार राज्य मंत्री कृष्णपाल गुर्जर, केंद्रीय सहकार व विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार, ना. चंद्रकांतदादा पाटील, ना.  प्रकाश आबिटकर, ना.  शिवेंद्रसिंहराजे भोसले, ना. हसन मुश्रीफ व अन्य मान्यवर उपस्थित राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.