जळकोट प्रतिनिधी :- कमलाकर वाघमारे
दिनांक 22 सप्टेंबर रोजी जळकोट शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये इ. स. 2005 मध्ये स्थापन झालेल्या युवा गणेश मंडळाकडून दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात त्यात प्रामुख्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. निबंध स्पर्धा वकृत्व स्पर्धा रांगोळी स्पर्धा आदर्श शिक्षकांचा सत्कार असे विविध उपक्रम राबवली जातात याचाच एक भाग म्हणून मागील काही वर्षे युवा गणेश मंडळ विभागातून द्वितीय व जिल्ह्यातून सर्वप्रथम येण्याचा याच गणेश मंडळांनी मान मिळवला होता.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विविध सामाजिक उपक्रम घेऊन त्यात सर्व रोग निदान शिबिर त्यात शुगर तपासणी बीपी सीबीसी थायरॉईड दंत तपासणी सर्व बाॅडी चेकाप व प्रामुख्याने महार रक्तदान शिबिराचे आयोजन करून मंडळाला यावर्षी 21 वर्ष पूर्ण झाल्याने 121 रक्तदात्याकडून रक्तदान करून घेण्यात आले व सर्व रक्तदात्यांना त्यांच्या सुरक्षिततेसाठी 121 हेल्मेटचे वाटप करण्यात आले.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन जळकोट तहसीलचे तहसीलदार श्री राजेश लांडगे पोलीस निरीक्षक श्रीराम माचेवाड नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी रोहित आरबोळे ,वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गजानन मोरे, दंत डॉक्टर अशोक राठोड, बालरोग तज्ञ डॉक्टर मारुती पाटील, डॉक्टर वरून आंधुरे यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करून लगेच रक्तदान केलेल्या रक्तदात्यास हेल्मेटचे वाटप करण्यात आले यावेळी युवा गणेश मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महेश भाऊ धुळशेट्टे मंडळाचे अध्यक्ष विजय कामशेट्टे उपाध्यक्ष गजानन डांगे सचिव सुजित रायवार सदस्य आनंद वाघमारे गजानन काळे रामेश्वर कारभारी अक्षय बडगिरे प्रमोद दाडगे गणेश मोरे महादेव होनराव विनोद मिरजगावे पिंटू हवा गणेश शिकले राहुल कोंडावार नागनाथ देशमुख व विविध वैद्यकीय अधिकारी व राधाई ब्लड बँकेचे कर्मचारी व अधिकारी, व युवा गणेश मंडळाचे सर्व सदस्य व गावातील प्रतिष्ठित नागरिक मान्यवर उपस्थित होते

