Breaking Ticker

मालवाहू वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; पट्टणकोडोली-हुपरी मार्गावर अपघात

   


पट्टणकोडोली : कर्नाटकातील सदलगा येथील तात्यासाहेब घोबडे


यांचा मालवाहू वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री घोबडे दुचाकीवरून पट्टणकोडोलीहून गावी निघाले होते. स्मशानभूमी परिसरात समोरून येणाऱ्या मालवाहू वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. धडकेनंतर घोबडे दुचाकीसह सुमारे १५ ते २० फूट फरफटत गेले. डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच हुपरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. या मार्गावर पथदिवे, स्पीड ब्रेकर, झेब्रा क्रॉसिंग व दिशादर्शक फलकांचा अभाव आहे. महिनाभरात दुसरा अपघाती बळी गेल्याने सुरक्षिततेच्या उपाययोजनांची मागणी होत आहे.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.