स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी ८ सप्टेंबरला जनसंकल्प मेळावा
कोरपना प्रतिनिधी : (जगन्नाथ पिदुरकर)
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीला बळ देण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने ‘विदर्भ निर्माण जनसंकल्प मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा मंगळवार, ८ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजता आहरी येथील इंडियन पॅलेस फंक्शन हॉल, महागाव रोड येथे होणार आहे.
विदर्भाच्या विकासासाठी स्वतंत्र राज्याची निर्मिती करणे, विदर्भातील महसुलावर विदर्भाचा अधिकार प्रस्थापित करणे, शेतकरी व बेरोजगारांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधणे, तसेच विदर्भातील अनुशेष दूर करण्यासाठी विविध मागण्या या मेळाव्यात मांडण्यात येणार आहेत.
‘नागपूर करार होळी आंदोलन’ तसेच २८ सप्टेंबर २०२६ रोजी ११ जिल्ह्यांत व १२० तालुक्यांत होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
विदर्भातील शेतकरी, बेरोजगार, कामगार, विद्यार्थी तसेच नागरिकांच्या प्रश्नांसाठी संघटनेने विविध मागण्या पुढे केल्या आहेत. केंद्र सरकारने विदर्भाचे स्वतंत्र राज्य तात्काळ निर्माण करावे, अन्यायकारक जीएसटीचा फेरविचार करावा, तसेच विदर्भातील विकासासाठी आवश्यक निधी व अनुशेषाचा प्रश्न सोडवावा, अशा मागण्यांचा त्यात समावेश आहे.
या जनसंकल्प मेळाव्यास विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्वतंत्र विदर्भाच्या समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
Show quoted text
Show quoted text
विद्यार्थ्यांनी साकारली शिक्षकांची भूमिका; कोडशी खुर्द येथे उत्साहात शिक्षक दिन साजरा
तालुका प्रतिनिधी. :- जगन्नाथ पिदुरकर
कोडशी खुर्द : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, कोडशी खुर्द येथे भारताचे माजी राष्ट्रपती व महान शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती व शिक्षक दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त शाळेत ‘स्वयंशासन दिन’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी एक दिवसासाठी शिक्षक, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच विविध मंत्र्यांच्या भूमिका साकारत अध्यापनासोबतच शालेय प्रशासनाची धुरा सांभाळली. विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका अत्यंत आत्मविश्वासाने पार पाडत विविध विषयांचे अध्यापन केले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना नेतृत्वगुण, निर्णयक्षमता, जबाबदारीची जाणीव, शिस्त आणि प्रशासकीय कार्यपद्धतीचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला.
कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. अर्चना वडे, उपाध्यक्ष महेश बोरडे, सदस्य प्रवीण पिदुरकार, विजय टोंगे तसेच पालक माधव कांबळे व सौ. मंजुषा पायताडे यांची उपस्थिती लाभली.
यावेळी मुख्याध्यापक कैलाश मस्के व शिक्षक महेश राठोड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षिका कु. पुष्पा सोयाम व शिक्षक अशोक राठोड यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे संचालन शाळेची सांस्कृतिक मंत्री कु. सृष्टी ईटकलवार हिने केले, तर स्वच्छता मंत्री कु. दिव्या मोहजे हिने आभार मानले.
स्वयंशासन उपक्रमाचे नियोजन शाळेची मुख्यमंत्री कु. धनश्री पायताडे, शिस्त मंत्री कु. समृद्धी तुमाणे, कु. गुंजन बोरडे, पर्यावरण मंत्री जीविका दुरूरकर, शालेय पोषण आहार (शापोआ) मंत्री कु. प्रांजली वैरागडे, उपमुख्यमंत्री नैतिक टोंगे, क्रीडामंत्री कु. आचल मोहजे, आयुष्य टेकाम व रुद्र कंडे यांनी केले.
विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका प्रभावीपणे साकारत शाळेचे प्रशासन आणि अध्यापनाची जबाबदारी उत्साहाने पार पाडल्याने ‘स्वयंशासन दिन’ हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा आणि त्यांच्या सुप्त नेतृत्वगुणांना वाव देणारा उपक्रम ठरला.
Show quoted text
विद्यार्थ्यांनी साकारली शिक्षकांची भूमिका; कोडशी खुर्द येथे उत्साहात शिक्षक दिन साजरा
तालुका प्रतिनिधी. - जगन्नाथ पिदुरकर