*मुखेड प्रतिनिधी मारोती पाटील वडजे *
शेकडो ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उपस्थितीत शिवाजी सर्व्हिस स्टेशन शुगर युनिटचे चेअरमन यांची मा.जि.प.अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर आणि शेतकरी नेते शिवशंकर पाटील कलंबरकर यांनी भेट घेऊन ऊसाला प्रतिटन 3500 रु. भाव दिलाच पाहिजे,ऊसाच्या भाववाढी शिवाय शेतकरी माघार घेणार नाही. आज कारखान्याने जाहीर केलेला भाव ऊस शेतकऱ्यांनी मान्य केला नाही. ऊसाची भाववाढ ही इतर कारखान्याप्रमाणेच झाली पाहिजे अशी ठाम भूमिका मांडली असता मा.कारखाना चेअरमन कडून ऊसाच्या भाववाढीसाठी कारखान्याला 2 तारखे पर्यंतचा वेळ मागितला आहे.
आणि सर्व ऊस शेतकऱ्यांच्या उपस्थितीत 2 तारखेपर्यंत कारखान्याने इतर कारखान्याप्रमाणे 3500 रु.प्रतिटन भाव जाहीर केला पाहिजे.अन्यथा सर्व ऊस उत्पादक शेतकरी 3 तारखेला रस्त्यावर उतरून 3500 रु.प्रतिटन भाव मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही असे निवेदन शिवाजी सर्व्हिस स्टेशन शुगर युनिटचे चेअरमन यांना शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत मा.जि.प.अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर व शेतकरी नेते शिवशंकर पाटील कलंबरकर यांनी दिनांक 25 ऑक्टोंबर रोजी दिले आहे.
