जळकोट प्रतिनिधी, कमलाकर वाघमारे
दिनांक 5 ऑक्टोबर 2026 रोजी जळकोट शहरातील व्यवसायिक मुद्रांक विक्रेते बळीराम नामवाड यांच्या उदयगिरी पेपर मार्ट आणि ऑनलाईन सर्विसेस या व्यापारी संकुलाच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या योजनेचे मोफत प्रमाणपत्र मोजे वांजरवाडा येथील लाभधारक निर्मलाबाई मारुती तोगरे यांना त्यांच्या पाल्याच्या वैद्यकीय उपचारासाठी सचिन वैजनाथ काडवादे, सहाय्यक प्रशासन अधिकारी पंचायत समिती जळकोट शांतवीर संजय कासनाळे कनिष्ठ सहाय्यक ले. खा. प. स. जळकोट आणि प्रा. डॉ. गंगाधर माधवराव तोगरे पत्रकार नवराष्ट्र तालुका प्रतिनिधी कंधार इत्यादी मान्यवरांच्या हस्ते मोफत वितरित करण्यात आले.

