कोल्हापूर : दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना शाहूपुरी पोलिसांनी सापळा रचून घातक शस्त्रांसह ताब्यात घेतले. जुना रामकृष्ण हॉल ते लोणार वसाहत रस्त्यालगतच्या मोकळ्या मैदानात ही कारवाई करण्यात आली.पोलिसांनी संशयितांची झडती घेतली असता त्यांच्याकडून दोन तलवारी, हॉकी स्टिक, लोखंडी कटावणी, मिरची पावडर, मोबाईल फोन, रिक्षा यासह दरोड्याच्या तयारीसाठी वापरले जाणारे साहित्य आढळून आले. पोलिसांनी एकूण १ लाख २७ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात BNS कलम ३१० (४) तसेच शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींपैकी काही जणांवर यापूर्वीही विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली दरम्यान, पोलिसांच्या या कारवाईमुळे संभाव्य दरोड्याचा प्रयत्न उधळून लावण्यात यश आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर गुणवरे करीत आहेत.
दरोड्याच्या तयारीत असलेल पाच जण ताब्यात; शाहूपुरी पोलिसांची मोठी कारवाई
0
October 06, 2026
Tags
