Breaking Ticker

कोल्हापुर तामगाव येथे गॅस सिलिंडर वाटपाची गाडी घरात घुसली



घराचे मोठे नुकसान नुकसानग्रस्त भोळे कुटुंबाला नुकसानभरपाई देण्याची मागणी

कोल्हापुर जिल्हा प्रतिनिधी: वैभव हराळे

तामगाव येथे गॅस सिलिंडर वाटपाची गाडी घरात घुसली; घराचे मोठे नुकसान नुकसानग्रस्त भोळे कुटुंबाला नुकसानभरपाई देण्याची मागणी तामगाव, ता. करवीर : कोल्हापूर तालुक्यातील करवीर येथील तामगावमध्ये दसरा चौक पाण्याच्या टाकीजवळ एक धक्कादायक घटना घडली. गॅस सिलिंडर वाटपासाठी आलेली गाडी चालकाविना उभी असताना अचानक पुढे सरकत थेट आप्पासो भोळे यांच्या घरात घुसली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

गॅस सिलिंडर वाटपासाठी आलेली गाडी अचानक घरात घुसल्याने परिसरात खळबळ उडाली. या अपघातामुळे भोळे यांच्या घराचे मोठे नुकसान झाल्याने कुटुंबासमोर आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसली, तरी घराच्या नुकसानीमुळे कुटुंबाला मोठा आर्थिक फटका बसला आहे.या घटनेची संबंधित गॅस वितरण कंपनीने गांभीर्याने दखल घेऊन नुकसानग्रस्त घराची पाहणी करावी आणि झालेल्या नुकसानीची योग्य भरपाई तातडीने द्यावी, अशी मागणी होत आहे. तसेच अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी संबंधितांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.