Breaking Ticker

खुलताबाद वाहतुुक नियंत्रण कक्ष नेहमी बंद प्रवाशातुुण संताप व्यक्त.....


 महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ च्या वरिष्ठ. अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे खुलताबादकर एस टी बसच्या सुविधेपासून वंचित


मुनीर शाह छ.संभाजीनगर..

, महाराष्ट्र सरकारने प्रवाशांच्या सोयीसाठी सुरु केलेले महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एस टी बस च्या सेवेपासून. खुलताबाद तालुक्यातील नागरिक व तीर्थस्थळ घृष्णेश्वर मंदिर जगगुरु जनार्दन स्वामी मंदिर, जगप्रसिद्ध वेरूळ लेणी, म्हैसमाळ येथील बालाजी मंदिर गिरजा देवी मंदिर, खुलताबाद. येथील जागृत देवस्थान भद्रा मारती श्री सुलिमांजन देवस्था नवरात्र महोत्सव काळात व सणासुदीच्या काळामध्ये एस टी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराने या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची मोठी गैरसोय होणार आहे ठिकाणाहून अनेक विद्यार्थी सवलतीचे पास काढून छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी शिक्षणासाठीजातात तसेच ज्येष्ठ नागरिक, महिला येणारे ची हि संख्याही मोठ्या प्रमाणात संभाजी असताना छत्रपती नगर ते खुलताबाद दरम्यान प्रवासात कुठलीही अडचण नसताना मनमानी पद्धतीने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ छत्रपती संभाजीनगर एस टी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारा मुळे एस टी महामंडळाचे मोठे नुकसान यामुळे होत असल्याचे दिसून येते

 खुलताबाद शहरात एस टी महामंडळाच्या मालकीच्या जागेवर नवीन बस स्थानक बिल्डिंग आमदार प्रशांत बंब यांनी तालुक्यातील जनतेच्या पर्यटकांसाठी जगभरातून येणाऱ्या भाविक भक्तांसाठी सुख सुविधा युक्त महत्त्वाची बाब म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडून ९ कोटी ९१ लाख रुपयाचे भव्य दिव्य सर्व सुविधा युक्त बिल्डिंग, मोठे काम हाती घेतले असून त्याचा शुभारंभ वॉल कंपाऊंड कंपाऊंडच्या कामापासून झाला असून जवळपास वॉल कंपाऊंड चे काम पूर्ण होत आले आहे प्रवाशांना सुख सुविधा देण्याचे काम या ठिकाणी शासन करीत असतानाही एस टी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या बेजोबदारपणा आडमुठ्या धोरणामुळे दि ६ ऑक्टोंबर पासून खुलताबाद बस स्थानकातील वाहतूक नियंत्रण कक्ष बंद केल्याचे दिसून येत आहे या मुळे या ठिकाणी अतिक्रमण घाण व कचराकुंडीचे स्वरुप, खाजगी वाहने बंद पडलेली वाहने उभे करण्यासाठी बस स्थानका च्या असलेल्या जागेचा दुरुपयोग होऊ शकतो या सर्व बाबीचा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विचार करून करून या ठिकाणचे वाहतूक नियंत्रण कक्ष तात्काळ सुरु करणे अत्यंत गरजेचे आहे याबाबत तात्काळ दखल घ्या बस सेवा सुरळीत चालू करा या बाबत गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत बंब यांनी दि ३० सप्टेंबर रोजी पत्र देऊन व खुलताबाद नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष नवनाथ बारगळ यानी नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोई बावत एस टी महामंडळाच्या वरिष्ठां अधिकाऱ्यांना निवेदन देऊन तात्काळ बस सेवा खुलताबाद वाहतूक नियंत्रण कक्ष सुरु ठेवण्याबाबत मागणी केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.