Breaking Ticker

श्री नंदिकेश्वर महाराज यांच्या हस्ते ग्रीन इंडीया चॅलेंज च्या शमी वृक्ष लागवडीचा शुभारंभ



सोनपेठ दि.११(प्रतिनिधी) शिवशंकर तुपकर.

 ग्रीन इंडीया चॅलेंज च्या वतीने महाराष्ट्रातील प्रत्येक गावात धार्मिक व पर्यावरणीय महत्त्व असलेल्या शमी वृक्षाच्या लागवडीची मोहिम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेतील महाराष्ट्रातील शमीवृक्ष लागवडीचा शुभारंभ नंदिकेश्वर मठ संस्थान सोनपेठ येथुन श्री नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शमीची लागवड करुन करण्यात आला.

ग्रीन इंडिया चॅलेंज च्या वतीने गेल्या नऊ वर्षांत वीस कोटी हुन अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. या वर्षी ग्रीन इंडिया चॅलेंज ची नववी आवृत्ती महाराष्ट्रात दि २४ जुलै रोजी गोदावरी नदीच्या काठावर दोन हजार बांबूच्या रोपांची लागवड करुन करण्यात आली आहे. ग्रीन इंडिया चॅलेंज च्या वतीने महाराष्ट्रात एक कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प संस्थापक श्री जे संतोषकुमार यांनी केला आहे. याच अंतर्गत धार्मिक सांस्कृतिक व पर्यावरणीय महत्त्व असलेल्या शमी वृक्षाची लागवड महाराष्ट्रातील प्रत्येक गावात श्री जे. संतोषकुमार यांच्या नेतृत्वाखाली आणि श्री राघव संजीव यादव यांच्या मार्गदर्शनाखाली राबविल्या जाणार आहे .'शमी' वृक्षाची लागवड महाराष्ट्रातील प्रत्येक गावात, मंदिरात, मठात आणि घराघरात केली जाणार आहे. या राज्यव्यापी वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर नंदीकेश्वर मठ येथे 'महाराष्ट्र वीरशैव लिंगायत शिवाचार्य महासभे'चे राज्य अध्यक्ष श्री नंदीकेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास 'ग्रीन इंडिया चॅलेंज'चे महाराष्ट्र समन्वयक सुधीर बिंदू, मुख्याध्यापक माणिक निलांगे, प्रदीप गायकवाड व राजकुमार धाबडे, शेतकरी नेते विश्वंभर गोरवे, पत्रकार सोमनाथ नागुरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.