Breaking Ticker

खुलताबाद तालुक्यातील दिव्यांगांना दिवाळीपुर्वी ५ टक्के ग्रामपंचायत निधी मिळावा; मागणीचे निवेदन..



 मुनीर शाह छ.संभाजीनगर रिपोर्टर 

खुलताबाद तालुक्यातील दिव्यांगांना दिवाळी पुर्वी ग्रामपंचायत चा ५ टक्के निधी मिळावा ची मागणी प्रहार दिव्यांग संघटनेकडून निवेदन द्वारे करण्यात आली. माननीय सभापती तथा गटविकास अधिकारी यांना प्रहार दिव्यांग संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले आहे. की खुलताबाद तालुक्यातील ग्रामपंचायतीचा दिव्यांगाचा शासन निर्णयानुसार पाच टक्के निधी हा दिवाळी अगोदर दिव्यांगाच्या खात्यावर वर्ग करण्यात यावा जेणेकरून दिव्यांगांना दिवाळी ही साजरी करता येईल. तालुक्यामध्ये बऱ्याच ग्रामपंचायतींना अजून दिव्यांगाचा निधी खर्च केलेला नसून तो खर्च करावा. व दिव्यांगाची दिवाळी ही गोड करावी. अन्यथा दिवाळीच्या दिवशी पंचायत समितीच्या आवारामध्ये फटाके फोडून निषेध आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रहार संघटनेने दिलेला आहे. यावेळी प्रहार

संघटनेचे तालुका अध्यक्ष सय्यद युसुफ, तालुका संपर्क प्रमुख गजानन भालेराव, महिला तालुकाअध्यक्ष लता बल्लाळ, उप तालुकाध्यक्ष हरिदास मस्कर, अरुण गायकवाड, हरिदास बल्लाळ, आदी उपस्थित होते.प्रत्युत्तर द्या

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.