उरण : सुनिल ठाकूर
नवरात्रौत्सवाच्या पाचव्या रात्री जय भवानी नवरात्रौत्सव मंडळ बोरखार आयोजित कराओके गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेसाठी स्पर्धेकांनी मोठ्या उत्साहाणे सहभाग घेतला या स्पर्धेत
प्रथम क्रमांक - अनिल पवार - ७०००/- ट्रॉफी
द्वितीय क्रमांक - आकाश गोंधळी - ५०००/- ट्रॉफी
तृतीय क्रमांक - प्रांजल पाटील + प्राजक्ता कडू ३०००/- ट्रॉफी यांनी पटकवला या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा माजी ग्रामपंचायत सदस्य मनोज ठाकुर,जय भवानी नवरात्रौत्सव मंडळ चे उपाध्यक्ष शंकर ठाकुर, श्री. शरद कृष्णा गावंड, श्री. विजय दामोदर गावंड, ओम साई सेवा मंडळ चे अध्यक्ष राजू गावंड, सौ. शर्मिला धर्मेंद्र पाटील, सौ. जागृती शैलेश गावंड, बापुजी देव कलामंच अमृत म्हात्रे यांच्या उपस्थितत संपन्न झाला या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून रायगड भूषण कीर्ती गोंधळी आणि सुप्रसिद्ध निवेदक सूत्रसंचालक विवेकजी पाटील यांनी जबाबदारी चोख पणे पार पडली या स्पर्धेचे निवेदन द्रोणागिरी भूषण जिवन डाकी यांनी खुप छान प्रकारे सादर केले
