Breaking Ticker

सम्राट अशोक विजयादशमी निमित्त भोन येथे भव्य अभिवादन सभा.



सुमेध दामधर तालुका प्रतिनिधी 

संग्रामपूर ( शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर २०२६) : तालुक्यातील भोन या गावी सम्राट अशोक कालीन प्राचीन बुध्द स्तुप संशोधनात सापडलेला आहे. हा स्तुप तथागत बुध्दांच्या पवित्र अस्थीवर बांधण्यात आला होता. या ठिकाणी मौर्य कालीन प्राचिन अवशेष देखिल मोठ्या प्रमाणात सापडलेले आहेत. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी या ऐतिहासिक पवित्र स्थळास अभिवादन करण्यासाठी २० आक्टोबर रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सम्राट अशोक विजयादशमी या ऐतिहासिक दिना निमित्त भोन बुद्धस्तूप बचाव संघर्ष कृती समिती व आजाद समाज पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने या अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन समाजभूषण गोल्डनमॅन डॉ. दिलीप खरात हे राहणार आहेत. तर प्रमुख मार्गदर्शक प्रसिद्ध इतिहासकार डॉ. विलास खरात राष्ट्रीय अध्यक्ष सनातन धम्म, प्रसिद्ध इतिहासकार डॉ.प्रताप चाटसे, डॉ.दिपकभाई केदार राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना,मनीषभाई साठे प्रदेश अध्यक्ष आ.स.पा.महाराष्ट्र, सिद्धार्थ देवरे प्रदेश उपाध्यक्ष आ.स.पा महाराष्ट्र, प्रा.प्रमोद मेश्राम प्रदेश प्रवक्ता आ.स.पा. महाराष्ट्र, सामाजिक कार्यकर्ते कुणाल पैठणकर हे राहणार आहेत. तसेच विविध सामाजिक धार्मिक व राजकीय पक्ष संघटनांचे मान्यवर या सभेला उपस्थित राहून संबोधित करणार आहे.करिता बौध्द उपासक-उपासीका तथा बहुजन समाज बांधवांनी मोठ्या संख्येने या भव्य अभिवादन सभेला उपस्थित राहावे,असे आवाहन आजाद समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सुजित बांगर व आयोजकांनी केले आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.