Breaking Ticker

श्री मातावैष्णवी दुर्गा देवी नवरात्र महोत्सव दतनगर सिडको नांदेड येथे महाकाली सोबत आठ दुर्गा चे रूपात सर्व भाविक झाले दंग



*नांदेड प्रतिनिधी मारोती पाटील वडजे*

नांदेड शहरातील एन डी४१के दतनगर सिडको नांदेड येथे श्री मातावैष्णवी दुर्गा देवी नवरात्र महोत्सव दतनगर सिडको नांदेड येथे अनेक कार्यक्रम देविचे भजन,गोंधळ, जोगवा, दांडीया ,तर त्यातील देवीचे नऊ अवतार घेऊन त्या देविच्या कार्याची माहिती देविचे अवतार घेतलेल्या महिलेने भक्तजनाला दिली

      त्यातील सर्व कार्यक्रमात श्री गुरुकृपा महिला भजनी मंडळ दतनगर सिडको यांच्या  महिलांनी साक्षात नऊ देविचे अवतार खालिल प्रमाणे

 शैलपुत्री – पर्वताची (हिमायतांची) कन्या, जी स्थैर्य आणि धैर्य दर्शवते.

• ब्रह्मचारिणी – तपस्या आणि संयमाची देवता.

• चंद्रघंटा – मस्तकावर अर्धचंद्र धारण करणारी, जी शौर्य आणि शांतीचे प्रतीक आहे.

• कुष्मांडा – विश्वाची निर्मिती करणारी देवी (आदि-शक्तीचा ऊर्जेचा गोळा).

• स्कंदमाता – भगवान कार्तिकेयाच्या (स्कंद) माता, जी वात्सल्याचे प्रतीक आहे.

• कात्यायनी – ऋषी कात्यायनांच्या आश्रमात जन्मलेली योद्धा देवी, जी न्यायाचे प्रतीक आहे.

• कालरात्री – भयाचा आणि नकारात्मकतेचा नाश करणारी रौद्र रूप धारण करणारी देवी.

• महागौरी – अतिशय शुद्ध, गोरा वर्ण असलेली आणि शांतीचे प्रतीक असलेली देवी.

• सिद्धिदात्री – सर्व प्रकारच्या आध्यात्मिक सिद्धी आणि वरदान देणारी देवी. अशा नऊ देविचे साक्षांत रूपामध्ये अवतार घेतलेल्या देविचे भक्तांनी दर्शन घेऊन आर्शिवाद घेऊन संतुष्ट झाले 

यात दुर्गा देविचे अवतार घेतलेल्या महिला सौ.नंदाबाई काचावार,सौ.सिधुबाई बागडे, सौ. शोभा देशमुख,  सौ. शारदाबाई डाकोरे, स्वाती मुक्कावार, सौ. उषा मोरे, सुप्रिया मोरे, सौ. स्वेता ठाकुर, सौ.राधिका जोशी, या नऊ महिलांनी  देवाच्या पात्रात भाविक भक्ताचे मने जिंकली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.