Breaking Ticker

गावातून इतिहासात पहिल्यांदाच गावातून डॉ. होणार अजय...



 तानाजी चंदे  प्रतिनिधी - गंगाखेड 

  गंगाखेड तालुक्यातील डोंगरी भागात असलेल्या पांढरगाव (तांडा ) हे अत्यन्त दुर्गम भागात असलेला तांडा असून.. आजपर्यंत शिक्षणाच्या अभावामुळे म्हणावी तशी प्रगती न झालेले गाव असून या गावात आजपर्यंत एकही विद्यार्थी डॉक्टर होऊ शकला न्हवता.. मात्र या नकारात्मक परंपरेला गावातील विद्यार्थी अजय देविदास पवार याने तोडले असून गावातील डॉक्टर होणारा तो पहिला विद्यार्थी म्हणून त्याने मान मिळवला आहे.. वडील शेती व्यवसाय करणारे असताना देखील कठीण परिश्रम आणि जिद्द याच्या जोरावर अजय ने हे यश मिळवले आहे.. अजय च्या या यशाबद्दल गावातील तसेच त्याच्या सर्व नातेवाईकांमध्ये त्याचे कौतुक होत आहे...

  अजय हा सिद्धकला आयुर्वेदिक महाविद्यालय अहिल्यानगर येथे बी. ए. एम. एस च्या प्रवेशकरिता पात्र झाला आहे.. त्याच्या वडिलांचे आणि आईचे स्वप्न साकार झाल्याचे म्हणत अजय ने सर्व श्रेय त्याच्या आई वडिलांना दिले..

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.