Breaking Ticker

स्त्रियांनी स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण घेणे गरजेचे :-व्याख्याते सचिन वासस्कर



 उरण :सुनिल ठाकूर 

नवरात्र हा मांगल्याचा, पावित्र्याचा व स्त्रीशक्तीचा जागर करण्याचा उत्सव असून, देवीच्या पराक्रमाची उपासना करणारा हा उत्सव आहे. समाजाची ढासळलेली नीतिमत्ता पाहता प्रतिकूल प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी स्त्रियांनी स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण घेणे अत्यंत गरजेचे बनले आहे. असे  प्रतिपादन नवरात्र उत्सव व आजची स्त्री व्याख्याते सचिन वासस्कर यांनी केले. अभिनव सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा मंडळाच्या नवरात्र उत्सवानिमित्ताने श्रीराम प्रसादिक भजन मंडळाच्या सामाजिक व धार्मिक योगदानाचा गौरव करणारा ज्येष्ठ भजनी मंडळ अभिनव सन्मान सोहळा गुरुवारी (दि.१५) आयोजित करण्यात आला होता. यावेळी  उरण पनवेल स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष तथा व्याख्याते सचिन वासस्कर हे बोलत होते. या अभिनव सन्मान सोहळ्यात समाजाला धार्मिक कार्याची प्रेरणा देणाऱ्या चिरनेर येथील  श्रीराम प्रासादिक भजनी मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या उल्लेखनीय व प्रेरक कार्याचा गौरव अभिनव नवरात्र उत्सव मंडळाकडून अभिनव सन्मान देऊन, मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यात भजनीबुवा वसंत दामोदर चिर्लेकर, भजनीबुवा वामन पांडुरंग म्हात्रे, दत्तात्रेय शंकर मोकल, शंकर बाबू नारंगीकर, रमेश मारुती गोंधळी, कृष्णा अनंत  म्हात्रे, धनाजी काळू नारंगीकर, बळीराम महादेव फोफेरकर, कमळाकर धनाजी केणी, विश्वास धनाजी मोकल, निशांत आनंद चिर्लेकर या सर्व भजनी मंडळीचा व्याख्याते सचिन वासस्कर, कार्याध्यक्ष पद्माकर  फोफेरकर, अध्यक्ष सुनील नारंगीकर, उत्सव समितीचे अध्यक्ष नितीन नारंगीकर, विकास म्हात्रे, पदाधिकारी राजेंद्र भगत व रवींद्र भगत यांच्यासह अन्य  कार्यकर्त्यांच्या हस्ते शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन राजेंद्र भगत यांनी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.