*मुखेड तालुक्याचा Trigger-1 दुष्काळ यादीत समावेश केल्याचा शासन निर्णय तातडीने काढावामाजी जि.प. अध्यक्ष बेटमोगरेकर यांच्या नेतृत्वाखाली वर्ताळा गणातून आंदोलनाला सुरुवातसॅटेलाईटद्वारे 50 टक्के भारांकनाची अट रद्द करावी यासह विविध मागण्या*
*मुखेड प्रतिनिधी मारोती पाटील वडजे*
मुखेड : मुखेड तालुक्याचा Trig-ger-1 दुष्काळ यादीत समावेश केल्याचा शासन निर्णय (GR) तातडीने काढावा, तसेच खरीप २०२६ पासून पीकविमा मंजुरीसाठी लागू करण्यात आलेली सॅटेलाईटद्वारे ५० टक्के भारांकनाची अट रद्द करावी, यासह विद्यार्थी, शेतकरी, मजूर व महिलांच्या विविध मागण्या मान्य करण्यासाठी मुखेड तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण व धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली.
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी नेते शिवशंकर पाटील कलंबरकर तसेच वर्ताळागणातील अनेक शेतकऱ्यांच्या उपस्थितीत महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून आंदोलनाची सुरुवात करण्यातआली.मुखेड तालुक्याचा Trigger-1 मध्ये समावेश करावा, या मागणीसाठी १ ऑक्टोबर रोजी मुखेड येथे तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यातयाच पार्श्वभूमीवर आता मुखेड तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण व धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. मुखेड तालुक्यातील दररोज एका गणातील शेतकरी या आंदोलनात सहभागी होणार असून, कार्यालयीन वेळेत मागण्या पूर्ण होईपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्यात येणार असल्याचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर म्हणाले.
आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी वर्ताळा गणातील शेकडो शेतकऱ्यांनी स्वाक्षरी करून आंदोलनातील विविध मागण्यांना पाठिंबा दिला. व नायब तहसीलदार सौ. शालिनी धुळे यांना निवेदन सादर करण्यात आले शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांची तातडीने दखल घेऊन मुखेड तालुक्याचा Trigger-1 मध्ये समावेश केल्याचा GR काढावा आणि पीकविम्यासह अन्य मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.आले होते. त्यावेळी मुखेड तालुक्याचा Trigger-1 मध्ये समावेश केल्याचा शासन निर्णय तातडीने काढावा, अशी मागणीकरण्यात आली होती. मात्र, अद्याप शासनाकडून याबाबतचा GR जारी झालेला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
