Breaking Ticker

वेतन रखडल्याने यंत्रचालक १ ऑक्टोबरपासून बेमुदत संपावर



प्रतिनिधी | जालना 

महावितरणच्या बाह्यस्त्रोत यंत्रचालकांचे मागील ५ ते ६ महिन्यांपासून वेतन थकीत असल्याने महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. थकीत वेतन अदा करून नवीन निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी करत १ ऑक्टोबरपासून कर्मचारी काम बंद करत बेमुदत संपावर गेले आहे.

संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक खंडागळे यांनी दिलेल्या निवेदनानुसार बाह्यस्त्रोत यंत्रचालकांनी मागील पाच महिन्यांपासून विना वेतन कर्तव्य बजावले आहे. मात्र अद्याप निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दुष्काळजन्य परिस्थिती, सणासुदीचे दिवस आणि बहुतांश कामगार शेतकरी असल्याने त्यांच्या अडचणी वाढल्याचे संघटनेने म्हटले आहे. त्यामुळे कामगारांचे किमान ५ ते ६महिन्यांचे थकीत वेतन तातडीने अदा करावे, अशी मागणी करत १ ऑक्टोबर गुरुवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासून जिल्ह्यातील सर्व बाह्यस्त्रोत यंत्रचालक बेमुदत काम बंद करून संपावर गेले आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.