कोल्हापुर :हातकणंगले तालुका दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट करा! जिल्हा परिषद सदस्या सौ. सोनाली सावंत यांचे तालुका कृषी अधिकान्यांना निवेदन; शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दुष्काळी परिस्थितीचे वस्तुनिष्ठ सर्वेक्षण करण्याची मागणी
शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी; शासनाने तातडीने निर्णय घ्यावा हातकणंगले तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागत असून, पिकांचे नुकसान आणि वाढत्या शेती खर्चामुळे आर्थिक अडचणी निर्माण होत आहेत. अशा परिस्थितीत शासनाने तालुक्यातील शेतीची सद्यस्थिती, पर्जन्यमान आणि पीक नुकसानीची वस्तुस्थिती लक्षात घेऊन योग्य निर्णय घेण्याची गरज आहे.दुष्काळग्रस्त यादीत समावेश झाल्यास शासनाच्या नियमानुसार पात्र शेतकऱ्यांना मदत व विविध सवलती मिळण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे संबंधित यंत्रणेने तातडीने सर्वेक्षण करून वस्तुस्थितीचा अहवाल शासनाकडे सादर करावा. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हातकणंगले तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा, अशी मागणी होत आहे.दुष्काळी परिस्थितीचे मूल्यमापन करणे महत्त्वाचे राज्यात दुष्काळी परिस्थितीचा सामना करणान्या भागांसाठी शासनाकडून विविध उपाययोजना केल्या जातात. मात्र, त्यासाठी संबंधित भागातील पर्जन्यमान, पीक नुकसान, पाणीटंचाई आणि शासनाच्या निर्धारित निकषांनुसार परिस्थितीचे मूल्यमापन होणे महत्त्वांचे असते. हातकणंगले तालुक्यातील शेतकन्यांना संभाव्य आर्थिक संकटातून दिलासा मिळावा, यासाठी प्रशासनाने तातडीने परिस्थितीची पडताळणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, हीच अपेक्षा
