पुणे जिल्हा प्रतिनिधी प्रविण वाघमोडे
राजमाता अहिल्यादेवी प्रतिष्ठान संचलित, विठ्ठलराव थोरात इंग्लिश मेडीयम स्कूल, येथे शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त महाभोंडला, गरबा व दांडिया कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष मा. बापूराव थोरात सर व सचिव मा. विजयभैय्या थोरात सर यांच्या प्रेरणेतून व प्राचार्या सौ. वंदना थोरात मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात देवीच्या व हस्त पूजन,आरतीने करण्यात आली. संस्थेच्या संचालिका सौ. संगिताताई थोरात, सौ. सुशिलाताई थोरात, सौ. सुनिताताई थोरात, सौ. सोनालीताई थोरात , पूजाताई थोरात यांच्या हस्ते नवदुर्गा देवीचे पूजन करण्यात आले.
त्यानंतर विद्यार्थिनींनी हत्तीची रांगोळी काढून गोलाकार फेर धरला. ऐलमा पैलमा, माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा यासारखी पारंपरिक भोंडल्याची गाणी म्हटली.
भोंडल्यानंतर कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असलेला महा गरबा व दांडिया उत्सव रंगला. विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी पारंपरिक वेशभूषेत गरबा व दांडियाच्या ठेक्यावर नृत्याचा आनंद लुटला.
कार्यक्रमात सर्वांसाठी खिरापत वाटण्यात आली व सेल्फी पॉइंट चे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे नियोजन प्राचार्या सौ. वंदना थोरात मॅडम व सर्व शिक्षक वृंद यांनी केले. तर सूत्रसंचालन सौ. रेशमा लोहार मॅडम यांनी केले. या कार्यक्रमास सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी पारपाडण्यासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
