पुणे जिल्हा प्रतिनिधी प्रविण वाघमोडे
भिगवण, ता. इंदापूर, जि. पुणे (दि. ११ ऑक्टोबर) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा क्रीडा परिषद, पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ९ व १० ऑक्टोबर २०२६ रोजी इंदापूर येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा २०२६-२७ मध्ये भिगवणच्या शाळेने बाजी मारली.
राजमाता अहिल्यादेवी प्रतिष्ठान संचलित, विठ्ठलराव थोरात इंग्लिश मिडीयम व माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय, भिगवण च्या खेळाडूंनी उत्कृष्ट कौशल्य सादर करत प्राविण्य मिळवले आहे.
यशस्वी खेळाडूंची कामगिरी अशी :
१) रोहित शांताराम कळसकर
(१९ वर्षे मुले )
भाला फेक - प्रथम क्रमांक
थाळी फेक - द्वितीय क्रमांक
गोळा फेक - तृतीय क्रमांक
भालाफेक व थाळीफेक या क्रीडा प्रकारात जिल्हास्तरीयसाठी निवड झाली .
२) पायल अजिनाथ धुमाळ (१४ वर्षे मुली) -
लांब उडी - तृतीय क्रमांक
३) श्रावणी मनोहर घायाळ (१७ वर्षे मुली) - भाला फेक - तृतीय क्रमांक
४) भाग्यश्री बाबासो खारतोडे (१७ वर्षे मुली) - थाळी फेक - तृतीय क्रमांक
या सर्व यशस्वी खेळाडूंना क्रीडा शिक्षक रुपेश भालेराव सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. बापूराव थोरात सर, सचिव मा. विजयभैय्या थोरात, प्राचार्या सौ. वंदना थोरात मॅडम व सर्व शिक्षकवृंद यांनी सर्व खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन केले. व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
