उरण : सुनिल ठाकूर
रयत शिक्षण संस्थेचे वीर वाजेकर कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय व रॉबिनहूड आर्मीचा आदिवासी पाड्यांवरील संयुक्त सेवायज्ञ शिक्षणाची गंगा बहुजन, कष्टकरी आणि उपेक्षित घटकांच्या दारापर्यंत नेणारे द्रष्टे शिक्षणमहर्षी, पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३९ व्या जयंतीचे औचित्य साधून उरण तालुक्यातील विविध दुर्गम आदिवासी कातकरी पाड्यांवर शाळेत जाऊन अन्नधान्य व खाऊ वाटपाचा उपक्रम राबविला.
या सामाजिक मोहिमेमध्ये महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग, हिंदी विभाग, अर्थशास्त्र विभाग, मराठी विभाग वाणिज्य विभाग, बी एम एस विभाग व ग्रामीण विकास विभाग यांनी समन्वयाने सहभाग नोंदवला. रॉबिनहूड आर्मीच्या मोलाच्या सहकार्याने या उपक्रमांतर्गत यापूर्वी कंठवली आदिवासी वाडी आणि विंधणे आदिवासी वाडी येथील १३५ गरजू कुटुंबांना अन्नदान करण्यात आले. तसेच चिरनेर आक्कादेवी आदिवासी शाळा व अंगणवाडी परिसरातील २५ कुटुंबांना अन्नधान्य वितरित करण्यात आले. सारडे जिल्हा परिषद शाळा 38 विद्यार्थ्यांना, महाविद्यालयातील सर्व सफाई कामगारांनाही धान्य वितरित करण्यात आले. याशिवाय पीरवाडी येथील कातकरवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील २५ विद्यार्थ्यांनाही अन्नधान्य व खाऊचे वाटप करण्यात आले.
सर्व विद्यार्थ्यांना बिस्किटे प्र. प्राचार्य डॉ. आमोद ठक्कर यांच्या वतीने खाऊ म्हणून विशेषत्वाने वाटण्यात आली. स्वतः प्राचार्य डॉ. आमोद ठक्कर यांनी दुर्गम आदिवासी पाड्यांवर प्रत्यक्ष उपस्थित राहून या वाटप मोहिमेचे नेतृत्व केले. समवेत राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. श्रीकांत गोतपागर, डॉ. झेलम झेंडे, डॉ. सुजाता पाटील, प्रा. देवेंद्र कांबळेमराठी विभाग प्रमुख प्रा. गजानन चव्हाण प्रा प्रांजल भोईर प्रा भूषण ठाकूरप्रा तन्वी कोळी प्रा रेणू माळी व स्वयंसेवक विद्यार्थ्यांचा अतिशय सक्रिय सहभाग राहिला.
