Breaking Ticker

एआय विश्लेषणाच्या साथीने रंगली टीसीएस इनक्विझिटिव्हची मुंबई फेरी



हिरानंदानी फाउंडेशन स्कूलचे विजेतेपद; २८ शाळांमधील १२६ संघांचा सहभाग


दैनिक समीकरण उरण :सुनिल ठाकूर 

 : आधुनिक तंत्रज्ञान आणि विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा संगम असलेल्या ‘टीसीएस इनक्विझिटिव्ह २०२६’ या आंतरशालेय प्रश्नमंजूषा स्पर्धेच्या मुंबई फेरीत ठाण्यातील हिरानंदानी फाउंडेशन स्कूलने विजेतेपद पटकावले. रोशन कन्ना आणि विवान कुंदेतकर या विजेत्या जोडीने राष्ट्रीय उपांत्य फेरीत स्थान मिळवले.

टीसीएस आयोजित या स्पर्धेत २८ शाळांमधील १२६ संघांनी सहभाग घेतला. यंदा स्पर्धेत एआय आधारित रिअल टाइम विश्लेषणाचा समावेश करण्यात आला होता. प्रत्येक फेरीनंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या कामगिरीचे विश्लेषण उपलब्ध करून देण्यात आले. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (स्टेम) यांसह विविध विषयांवर आधारित प्रश्नांनी स्पर्धेची रंगत वाढवली.

टीसीएस मुंबईचे सेंटर हेड मिलिंद कांबळे म्हणाले, “आजच्या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी दाखवलेले ज्ञान, हजरजबाबीपणा आणि सांघिक कामगिरी उल्लेखनीय होती. नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करत विद्यार्थ्यांना विचार करण्यास आणि ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यास प्रोत्साहन देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.”

यंदा २८व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या या स्पर्धेच्या विभागीय फेऱ्या देशातील विविध शहरांमध्ये आयोजित करण्यात येत आहेत. त्यानंतर राष्ट्रीय महाअंतिम फेरीत ‘टीसीएस इनक्विझिटिव्ह नॅशनल चॅम्पियन्स २०२६’ हा किताब मिळवण्यासाठी विजेते संघ आमनेसामने येतील.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.