Breaking Ticker

देगलूर येथे महिला बचत गटांचा दीपोत्सव २०२६ चा शुभारंभ



 दैनिक समीकरण देगलूर / मारोती पाटील वडजे 

देगलूर - दिनांक ०२ नोव्हेंबर २०२६ रोजी नगर परिषद देगलूर च्या वतीने, मा. नगराध्यक्षा सौ. विजयमाला बालाजीराव टेकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नगर परिषद मुख्याधिकारी श्रीमती निलम बाबुराव कांबळे यांच्या पुढाकारातून "महिला बचतगटांचा दीपोत्सव २०२६" चा शुभारंभ थाटामाटात करण्यात आला. सदरील कार्यक्रम ०४ नोव्हेंबर २०२६ पर्यंत तीन दिवस देगलूर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर डिजिटल आभ्यासिकेच्या इमारती मध्ये चालणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. नगराध्यक्षा सौ. विजयमाला बालाजीराव टेकाळे यांच्या शुभहस्ते झाले. उदघाटन प्रसंगी नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा सौ उज्वला लक्ष्मीकांत पदमवार सभापती सौ. शोभा दिगंबर कडलवार, सौ. योगेश्वरी लक्ष्मण तोटावार, शेख - आर्शिया फातेमा पाशामियाँ, सौ. अंजली अंकुशराव देसाई तसेच मुख्याधिकारी श्रीमती निलम बाबुराव कांबळे यांची उपस्थिती होती. उद्घाटन प्रसंगी नगराध्यक्षा सौ. विजयमाला बालाजीराव टेकाळे यांनी सहभागी सर्व बचतगटांच्या उत्पादनांची पाहणी करून

कौतुक केले आणि देगलूर शहरातील जनतेला दीपावलीची खरेदी करताना प्रथम प्राधान्य हे "महिला बचतगटां दिपोत्सव २०२६" निमित्ताने आयोजित बचतगटांच्या स्टॉल साठी देण्याचे आवाहन केले तर मुख्याधिकारी श्रीमती निलम कांबळे यांनी नगर परिषदेच्या शिफारशीतुन देगलूर शहरातील १२ बचतगटांना "प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग" डरे प्रत्येकी ४ लाखांचे अर्थ साहाय्य दिले आहे आणि यापुढें देगलूर शहरातील इतर बचतगटांनी उद्योगाची सुरुवात करावी नगर परिषद देगलूर डरे त्यांना अर्थसहाय्या साठी योग्य मार्गदर्शन करून अर्थसाह्यय उपलब्ध करून देण्यात येईल असे सांगितले. महिला बचतगटांचा दीपोत्सव २०२६ मध्ये शहरातील ५० बचतगट सहभागी झाले आहेत. ज्यामध्ये दिपावली निमित्ताने वेगवेगळे खाद्यपदार्थ, साज सजावटीसाठी लागणारे साहित्य, दागिने तसेच साडी व ड्रेसेस यांचा समावेश होता.

कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांचा प्रतिसाद खूप मिळत आहे त्याबद्दल सहभागी बचतगटांच्या मध्ये आनंदाचे वातावरण दिसून येते आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.