दैनिक समीकरण उरण : सुनिल ठाकूर
पुणे येथील श्री साई बाबा पालखी सोहळा समितीच्या वतीने धाराशिव जिल्हा उमरागा तालुक्यातील बोरी येथे दुष्काळग्रस्त १५० शेतकरी कुटुंबांना दिवाळी फराळाचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली.
यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. खरीप हंगामातील पिकांना अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने अनेक शेतकरी कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले आहे. अशा परिस्थितीत दिवाळीसारखा आनंदाचा सण साजरा करताना अनेक कुटुंबांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन श्री साई बाबा पालखी सोहळा समितीने बोरी येथील दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांसोबत दिवाळीचा आनंद वाटून घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १५० शेतकरी कुटुंबांना दिवाळी फराळ तसेच आर्थिक मदतचे वाटप करण्यात आली. यावेळी पालखी सोहळा समितीचे अध्यक्ष रमेश भोसले, सचिव मंदार शहाणे, कार्याध्यक्ष किरण कदम, महावीर क्षिरसागर, विश्वस्त विजय मेघे, गोकुळ राहुरकर, देविदास फडतारे, अरुण वीर, संजय पवळे, संजय खरोटे, राकेश मुगळे, रवि इंगळे आदीसह शेतकरी उपस्थित होते.
संकटात धावून आलेली साई पालखी समिती; मदतीचा हात कायम
पुणे येथील कसबा गणपती मंदिरातून गुरुपौर्णिमेनिमित्त दरवर्षी पुणे ते शिर्डी पायी पालखी सोहळ्याचे आयोजन केले जाते. या सोहळ्यात यंदाही पालखी सोहळा आटोपून बोरी कडे परतत असताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला, तर काही जण गंभीर जखमी झाले होते. या दुःखद प्रसंगी पालखी सोहळा समितीने केवळ संवेदना व्यक्त न करता प्रत्यक्ष मदतीसाठी पुढाकार घेतला.
