२५०४ सभासदांना २९ लाख ६९ हजार रुपयांचा लाभांश;आमदार राहुलदादा कुल यांच्या हस्ते ग्रामस्थांच्या उपस्थितीत वितरण सोहळा संपन्न.
दैनिक समीकरण प्रतिनिधी वरवंड (ता. दौंड) :
दि.१२नोव्हें. दिवाळीच्या सणानिमित्त वरवंड विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या वतीने संस्थेच्या तब्बल २५०४ सभासदांना १२ टक्के दराने एकूण २९ लाख ६९ हजार रुपयांच्या लाभांशाचे वाटप करताना त्यापैकी काही जेष्ठ नागरिकांना आमदार राहुलदादा कुल यांच्या हस्ते लाभांश धनादेश स्वरूपात तर इतर सभासदांच्या बँक खात्यात ग्रामस्थांच्या उपस्थितीत वितरणाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोसायटीच्या सभासदांना लाभांशाच्या माध्यमातून आर्थिक लाभ मिळाल्याने सभासदांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले. सहकारी संस्थेच्या माध्यमातून सभासदांच्या आर्थिक हिताला प्राधान्य देत दिवाळीच्या सणात लाभांश वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी आमदार राहुलदादा कुल यांच्या हस्ते लाभांश वितरण करताना वरवंड गावातील आजी-माजी पदाधिकारी, विविध सहकारी व सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
दिवाळीच्या सणाला तसेच यात्रा उत्सवाच्या निमित्ताने २५०४ सभासदांना २९ लाख ६९ हजार रुपयांचा लाभांश वितरीत केल्याने वरवंड विविध कार्यकारी सोसायटीच्या या उपक्रमाचे सभासद व ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात येत आहे.
