दैनिक समीकरण प्रतिनिधी,जळकोट कमलाकर वाघमारे
दुभत्या व इतर पशुधनाच्या आरोग्यासाठी आणि दूध उत्पादनात वाढ करण्यासाठी पारंपारिक पिकासोबतच प्रगत व पौष्टिक चारा लागवडीसाठी पुढे यावे असे आव्हान पंचायत समिती जळकोटच्या गट विकास अधिकारी (BDO)चितारी यांनी केले आहे बदलत्या हवामानामुळे आणि वाढत्या उन्हामुळे भविष्यात चाऱ्याची टंचाई भासू नये यासाठी शेतकऱ्यांनी आतापासूनच नियोजन करणे गरजेचे आहे केवळ सुका चारा देण्याऐवजी हिरवा व सकस चाऱ्यासाठी लागवड केल्यास जनावरांची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि दुग्ध व्यवसायाला मोठा फायदा होतो शासनामार्फत चारा लागवडीसाठी विविध अनुदान योजना बियाणे वितरण व तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाते या योजनेचा लाभ थेट तळागाळातील शेतकऱ्यापर्यंत पोहोचावा हा प्रशासनाचा मुख्य उद्देश आहे.
