Breaking Ticker

गोकुळमधील सत्ताबळासाठी राजकारणाविरोधात महायुतीच्या कोल्हापुरात संघर्ष मोर्चा!



दैनिक समीकरण

सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली दूध उत्पादक शेतकरी व जनतेचा सोमवारी दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) मधील सत्ता बळकावण्यासाठी महायुतीने केलेल्या कथित कुटील राजकारणाविरोधात स्वाभिमानी दूध उत्पादक शेतकरी आणि जनतेच्या वतीने कोल्हापुरात संघर्ष मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाच्या माध्यमातून महायुतीच्या राजकीय डावपेचांविरोधात जोरदार आवाज उठविण्यात येणार आहे सोमवार, ९ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता दसरा चौकातून या संघर्ष मोर्चाला प्रारंभ होणार असून, मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. 

गोकुळमधील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर दूध उत्पादक शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेला मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.गोकुळ हा कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक जीवनाचा महत्त्वाचा आधार आहे. या संस्थेच्या सत्तेवरून सुरू असलेल्या राजकीय हालचालींविरोधात दूध उत्पादक शेतकरी आणि जनतेची भूमिका स्पष्ट करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येत आहे.'स्वाभिमानी कोल्हापूरची ताकद दाखवा, हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा!' असा निर्धार व्यक्त करत संघर्ष मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मोर्चाचा मार्ग : दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयदिनांक : सोमवार, ९ नोव्हेंबर २०२६ वेळ : सकाळी १० वाजता गोकुळमधील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर हा मोर्चा कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.