दैनिक समीकरण जिल्हा प्रतिनिधी मनोहर भाऊ यरपुरवाड
पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जांब बु., ता. मुखेड, जि. नांदेड येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ व २०२७-२०२८ या दोन वर्षांच्या कालावधीसाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या पालक सदस्यांची निवड प्रक्रिया शांततापूर्ण वातावरणात पार पडली. यावेळी आरक्षणानुसार विविध प्रवर्गांतून एकूण १५ पालक सदस्यांची निवड करण्यात आली.
शाळा व्यवस्थापन समितीची निवड प्रक्रिया उत्साहात संपन्न; १५ पालक सदस्यांची निवड
उपस्थित पालकांची नोंदणी करून शांततापूर्ण वातावरणात वर्गनिहाय निश्चित करण्यात आलेल्या आरक्षणानुसार पालक सदस्यांची निवड करण्याची जबाबदारी संबंधित वर्गशिक्षकांवर सोपविण्यात आली होती.
निवड प्रक्रियेचे नियंत्रक श्री. बनसोडे साहेब, विशेष शिक्षक श्री. माजिद गुरुजी आणि शाळेचे मुख्याध्यापक श्री. थोटे गुरुजी यांच्या उपस्थितीत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या वर्गांमधून आरक्षणानुसार पालक सदस्य निवडीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. पालकसभेत मतदान व सर्वसंमतीच्या माध्यमातून ही निवड करण्यात आली.
निवड झालेल्या शाळा व्यवस्थापन समितीच्या पालक सदस्यांची नावे पुढीलप्रमाणे :
1. धनराज नागोराव मोरे – सर्वसाधारण प्रवर्ग, इयत्ता पहिली
2. रावसाहेब बाबुराव राऊतवाड – अनुसूचित जमाती, इयत्ता पहिली
3. रवि तानाजी कटाळे – सर्वसाधारण प्रवर्ग, इयत्ता दुसरी
4. शिवदास बालाजी कानगुले – ओबीसी प्रवर्ग, इयत्ता दुसरी
5. गोविंद देविदास घोडके – सर्वसाधारण प्रवर्ग, इयत्ता तिसरी
6. नितेश निवृत्ती गायकवाड – अनुसूचित जाती, इयत्ता तिसरी
7. श्रीकांत पंडितराव सूर्यवंशी – सर्वसाधारण प्रवर्ग, इयत्ता चौथी
8. धनराज सोनबा यरपुरवाड – अनुसूचित जमाती, इयत्ता चौथी
9. निळकंठ मारोती कोरे – सर्वसाधारण प्रवर्ग, इयत्ता पाचवी
10. सोमनाथ बालाजी फुल्लारी – ओबीसी प्रवर्ग, इयत्ता पाचवी
11. विश्वनाथ विस्वांभर वंजे – सर्वसाधारण प्रवर्ग, इयत्ता सहावी
12. संभाजी सोपान शिकारे – अनुसूचित जाती, इयत्ता सहावी
13. संभाजी पंडितराव सूर्यवंशी – सर्वसाधारण प्रवर्ग, इयत्ता सातवी
14. हुशेन नबिसाब मुजावर – अल्पसंख्याक प्रवर्ग, इयत्ता सातवी
15. राजाराम नरबाजी पुंडे – दिव्यांग राखीव प्रवर्ग
या निवड प्रक्रियेमुळे शाळेच्या शैक्षणिक विकासात पालकांचा सहभाग अधिक प्रभावी होण्यास मदत होणार असून, शाळेच्या प्रगतीसाठी नवनिर्वाचित सदस्यांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
