दिघोडे गावात अंडरग्राउंड केबल सबस्टेशनच्या हालचालींना वेग !
दैनिक समीकरण प्रतिनिधी उरण :सुनिल ठाकूर
उरणकरांच्या नशिबी आलेला विजेचा लपंडाव संपणार तरी कधी? वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, कमी-जास्त दाबाचा त्रास आणि वीज वितरणातील अनियमिततेमुळे नागरिक, व्यापारी व व्यावसाधिक त्रस्त झाले आहेत. या समस्येवर तात्पुरत्या मलमपट्टीऐवजी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी दिघोडे येथे अंडरग्राउंड केबलसह सबस्टेशन उभारण्याच्या हालचालींना आता वेग आला आहे.
माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर व कुंदा ठाकूर या दाम्पत्याने उरणच्या वीजसमस्येचा प्रश्न गांभीर्याने घेत खासदार सुनील तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे दिघोडे येथे सबस्टेशन उभारण्याची मागणी केली होती. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवण्यात आला. या प्रयत्नांना आता प्राथभिक स्वरूपात यश मिळत असून, प्रकल्पासाठी प्रस्तावित जागेचा शासकीय सर्व्हे व मोजणी करण्यात आली आहे
दिघोडे येथे प्रस्तावित सबस्टेशनच्या जागेची मोजणी करताना उपस्थित मान्यवर व अधिकारी दिघोडे येथे प्रस्तावित सबस्टेशनच्या जागेची मोजणी उरण भूमिअभिलेख विभागाच्या कर्मचारी सलोनी हिंदोळे आणि वीज वितरण विभागाचे अभियंता किसन गायकवाड यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर, कुंदा ठाकूर, नितीन किसन वाणी, अमित पाटील, प्रमोद शेळके, विशाल पाटील, आस्मक पाटील, आस्मक पाटील, मयूर पाटील, दीपक दीपक नाईक, जयप्रकाश घरत यांच्यासह भूमिअभिलेख
या प्रकल्पासाठी कोट्यवधी रूपयांचा निधी अपेक्षित असून, खासदार सुनील तटकरे व मंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमततून मंत्रालय स्तरावर निधी उपलब्ध करून घोण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. प्रस्तावित सबस्टेशन आणि अंडरग्राउंड केबल यंत्रणा कार्यान्वित झालयानंतर उरण परिसरातील वीजपुरवठा अधिक सक्षम व स्थिर होण्यास मदत होईल, असा विश्वास वैजनाथ ठाकूर यांनी व्यक केला.
मात्र, केवळ जागेची मोजणी करून प्रश्न सुटणार नाही. निधी मंजूरी, प्रशासकीय मान्यता, प्रत्यक्ष कामाची सुरुवात आणि प्रकल्प पूर्णत्वास नेण्याची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे या प्रकल्पाची घोषणा कागदावरच न राहता प्रत्यक्षात उतरावी, अशी अपेक्षा उरणकर व्यक करीत आहेत.
उरणच्या विकासासाठी आणि जनतेच्या मूलभूत सुविधांसाठी हा प्रकल्प महत्वाचा आहे. त्यामुळे जनतेने राजकारण बाजूला ठेवून जनहिताच्या या कामाला सहकार्य करावे.- वैजनाथ ठाकूर- माजी जिल्हा परिषद सदस्य
