लोणार, दि.2 सुनिल वर्मा
लोणार तालुक्यात व शहरात रेतीअभावी बांधकाम बंद झालेली असल्यामुळे बांधकामावर उपजीविका असणारे बांधकाम ठेकेदार, मिस्त्री व मजूर यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. सर्वच बांधकामे हे रेतीवर अवलंबून असल्यामुळे रेती अभावी या संबंधित काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.अशीच परिस्थिती अजून काही दिवस चालू राहिल्यास ठेकेदार, मंजुर व त्यांच्या कुटुंब उपासमारीची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. पावसाळा जवळ येत असल्यामुळे ज्या ठिकाणी रेती काढण्यात येते अशा नद्यांना पूर येऊन पाणी आल्यानंतर पुढील सात ते आठ महिने रेतीचा पुरवठा होणे शक्य होणार नाही.
त्यामुळे शासनाने लवकरात लवकर रेती चालू करण्या संबंधित निर्णय घेऊन रेतीचा पुरवठा कसा लवकरात लवकर करता येईल, यासंबंधी निर्णय घेणे गरजेचे आहे असे न झाल्यास तालुक्यातील ठेकेदार मिस्त्री मजूर यांना आपले कुटुंब घेऊन तहसील कार्यालयावर आंदोलन करावे लागेल, त्यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीला प्रशासन जबाबदार राहील. अशा आशयाचे निवेदन लोणार तालुक्यातील बांधकाम ठेकेदार, मिस्त्री व मजुर यांनी लोणार तहसिल चे तहसीलदार गिरीश जोशी यांना द्या या वेळी तालुक्यातील शेख अब्दुल शेख इब्राहिम कॉन्ट्रॅक्टर, शेख जमीर कॉन्ट्रॅक्टर, अशोक कलासरे, राधेश्याम दीक्षे कॉन्ट्रॅक्टर, बाबर कॉन्ट्रॅक्टर, शेख मीर मिस्त्री, शेख रहीम मिस्त्री, गजानन मिस्त्री, अमजद मिस्त्री, सलमान मिस्त्री, महादा मिस्त्री, जरीनाखान कॉन्ट्रॅक्टर, सालीमखान कॉन्ट्रॅक्टर, शेख मीर मिस्त्री. मधुकर मोरे मिस्त्री, शेख इनूस कॉन्ट्रॅक्टर, शेख अजीस मिस्त्री, शेख अमीर मिस्त्री, शालीराम पाटोळे मिस्त्री, शेख उबेद कॉन्ट्रॅक्टर, शेख अख्तर मिस्त्री व इतर ठेकेदार, मजूर हजर होते
