सुनिल वर्मा तालुका प्रतिनिधी लोणार
दिनांक 15/ 6 /2023 वार गुरुवार रोजी गितम गेस्ट हाऊस हॉल लोणार येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जिल्हा बुलडाणा यांच्यावतीने अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जिल्हाध्यक्ष संतोष खांडेभराड यांच्या नेतृत्वात संस्थापक अध्यक्ष आदरणीय छगनराव भुजबळ साहेब यांच्या आदेशाने प्रदेश संघटक श्री रवी भाऊ सोनवणे, प्रदेश प्रचारक प्राध्यापक संतोष विरकर सर व नागेश गवळी सर, विभागीय अध्यक्ष अरविंद गाभणे सर यांच्या उपस्थितीत ओ.बी.सी.च्या न्याय हक्क व संघटनात्मक बांधणी यासाठी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले यावेळी समीर भाऊ भुजबळ यांनी व्हिडिओ कॉल करून समता सैनिकांशि संवाद साधला व obc च्या प्रश्नांवर चर्चा केली प्राध्यापक विरकर सर यांनी महात्मा फुले च्या जीवनावर प्रकाश टाकत असताना आदरणीय भुजबळ साहेब हे ओबीसींच्या न्याय हक्कासाठी सदैव लढत आहेत डॉक्टर नागेश गवळी यांनी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद ओबीसीसाठी आहोरात्र कार्य करत आहे व ओबीसी समाजाला शिष्यवृत्तीअसेल राजकीय आरक्षण असेल ओबीसींच्या लोकसंख्या प्रमाणे त्यांना सर्व ठिकाणी आरक्षण मिळाले पाहिजे व त्यासाठी आदरणीय भुजबळ साहेब यांनी त्यांच आयुष्य खर्ची घातले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश भाऊ सानप यांनी महात्मा फुले चे कार्य व त्याप्रमाणे जिल्ह्यातील समता परिषदेचे कार्य चांगल्या पद्धतीने चालू आहे याची ग्वाही दिली प्रस्ताविकामध्ये जिल्ह्याचे अध्यक्ष संतोष खांडेभराड यांनी यापूर्वी जिल्ह्यातील झालेल्या कामाचा लेखाजोखा आढावा या ठिकाणी मांडला लोणार नगरसेवक गजानन खरात , सुदन अंभोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तालुका अध्यक्ष म्हणून सचिन रामदास कापुरे, शहर अध्यक्ष रंजित जावळे, शहर उपाध्यक्ष गजानन घोडके तर शहर कार्याध्यक्ष नारायण आढाव महिला समता आघाडीतून
डॉ अनुपमा प्रदिप झोरे महिला तालुका अध्यक्ष, सुजाता सचिन कापुरे तालुका कार्याध्यक्ष, शहर अध्यक्ष मंजुषा गजानन खरात, शहर उपाध्यक्ष वैशाली खांडेभराड, शहर कार्याध्यक्ष सविता संदीप अवचार यांची नियुक्ती समता परिषद मध्ये करण्यात आली
सूत्रसंचालन डॉ प्रदीप झोरे यांनी केले कार्यक्रमास जिल्हा संघटक एकनाथ सोनाजी सोनुने, रामदास त्रंबक कापुरे, गजानान इरतकर, पुरुषोत्तम इरतकर, दत्ता राऊत, गजानन काडतूजी जाधव, विठ्ठल लांडगे, अशोक जाधव, योगेश खंदारे, नारायण राऊत, मछिंद्रनाथ जाधव, सपना सतीश इंगळे, भाग्यश्री गजानन जाधव, ज्योती आनंद अवचार, दीपाली श्रीकांत अवचार, शीतल गोपाल राऊत, अर्चना दीपक अवचार, सविता अवचार, नगर सेवक व समता प जिल्हा उपाध्यक्ष गजानन जाधव, मा.नगर सेवक शाम राऊत, विठ्ठल जाधव, वसंत मापारी, विजय गोरे, रमेश मोरे, आत्माराम खोटे, समता परिषद किनगाव जट्टू अध्यक्ष जाधव, रामेश्वर जावळे व सर्व मान्यवर आदी स्तरातील ओबीसी बांधव हजर होते.
